पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स आणि टेक्नोलॉजी पार्कला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी शुक्रवारी भेट दिली आणि तब्बल दोन तास चर्चा केली. ही एक अनौपचारिक भेट असल्याचे सांगितले जात असले तरी विविध चर्चांना उधाण आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स आणि टेक्नोलॉजी पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगदाळे म्हणाले, सायन्स आणि टेक्नोलॉजी पार्कमध्ये येण्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी अश्वासन दिले होते. परंतु त्यांना येता आले नाही. (Latest Pune news)
अखेर शुक्रवारी दोघांनी सायन्स आणि टेक्नोलॉजी पार्कला भेट दिली आणि बराच वेळ घालवला. यावेळी सायन्स आणि टेक्नोलॉजी पार्क आणि अदानी गृप हे मिळून काय करता येईल. सायन्स आणि टेक्नोलॉजी पार्कमध्ये काय कार्य चालते, याची माहिती घेतली. सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी पार्कच्या माध्यमातून सुरू असलेल्या काही स्टार्टअपसंदर्भात त्यांनी माहिती घेतली.
त्याचबरोबर सोशल कार्पोरेटस रिस्पॉन्सीबिलीटी अर्थात सीएसआरच्या माध्यमातून काय करता येईल यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली. ही एक अनौपचारिक भेट असल्यामुळे अन्य कोणतीही चर्चा झाली नसल्याचे जगदाळे यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या सायन्स आणि टेक्नोलॉजी पार्कमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट देऊन बराच वेळ घालवला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे सख्य पाहता पडद्याआड काहीतरी मोठी घटना घडणार आहे का याविषयी विद्यापीठ वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.