कांदा पिकावर मावा, करपा रोगांचा प्रादुर्भाव

कांदा पिकावर मावा, करपा रोगांचा प्रादुर्भाव

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कांदा पिकावर दूषित हवामानाचा परिणाम झाला आहे. पिकावर मावा, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांना वरचेवर महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होत खर्चात मोठी वाढ झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात शेतकर्‍यांनी घेतलेल्या कांदा पिकास आता जवळपास एक ते दीड महिने झाले आहे. सुरुवातीपासूनच कांद्याला दुषित हवामानाचा सामना करावा लागला. सततचे ढगाळ हवामान, थंडीचे कमी-अधिक प्रमाण यामुळे कांदा पिकावर मावा, रसशोषित किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा पिकाच्या पाती पिवळ्या पडल्या आहेत. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकर्‍यांना महागड्या औषधांची वरचेवर फवारणी करावी लागत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, खर्चात मोठी वाढ झाली आहे. कांदा रोपे, लागवड, मजुरी यासाठी शेतकर्‍यांना अगोदरच मोठे भांडवल गुंतवावे लागले आहे. आता औषध फवारणीचा खर्च वाढल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news