आम्ही सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार : राजू शेट्टी | पुढारी

आम्ही सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार : राजू शेट्टी

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्ही सहा जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत, असे वक्तव्य राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. यावेळी आमच्या दोघांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या –

राजू शेट्टी म्हणाले, अदानी समूह पाटगावचे पावणे चार टीएमसीचं पाणी ८४०० कोटी रु. खर्चुन सिंधुदुर्गात नेत आहे. तिथे प्रकल्प उभारणार आहे. या अदानींच्या प्रकल्पाला विरोध आहे. अदानी उद्योग समुहाच्या प्रकल्पाला विरोध आहे. जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा अदानींविरोधात लढाई ही शेतकऱ्यांची लढाई आहे. अदानींविरोधातील चळवळींमध्ये ठाकरेंचा पाठिंबा घेणं काही गैर नाही. शिवसेनेचा या आंदोलनासाठी पाठिंबा मिळावा, यासाठी भेट आहे. त्यांनी नेहमी तुमच्याबरोबर राहु, असे आश्वासन दिले आहे. सिंधुदुर्गाच्या लोकांची आम्हाला साथ हवीय. अदानींच्या प्रकल्पाविरोधात आंदोलन करणार असल्याचे नमूद केले.

मविआमध्ये सहभागी होण्यासंदर्भात ते म्हणाले, मविआशी काही देणं घेणं नाही. मविआमध्ये सहभागी होण्याचा कोणताही निर्णय नाही. येत्या १५ तारखेपासून मराठवाडा दौरा करणार आहे. आम्ही सहा जागांवर स्वतंत्र निवडणूक लढवणार. शेतकऱ्यांविषयी जोपर्यंत धोरण राबवत नाही, तोपर्यंत मविआमध्ये जाणार नाही.

कच्च्या तेलाच्या दराबाबतही त्यांनी आपले मत मांडले.

Back to top button