पारगाव : कांदा पिकावर आकडी रोगाचा प्रादुर्भाव

पारगाव : कांदा पिकावर आकडी रोगाचा प्रादुर्भाव

पारगाव (ता.आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : सततच्या ढगाळ हवामानामुळे नवीन लागवड झालेले अगाप कांदा पीक धोक्यात आले आहे. कांदा पिकावर आकडी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कांद्याचे शेंडे पिवळे पडून वाकले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे. पारगाव परिसरात यंदा उन्हाळी कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी केल्या.

कांदा पीक जवळपास एक ते दीड महिन्याचे झाले आहे. परंतु मागील पाच ते सहा दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर आकडी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कांद्यांचे शेंडे पिवळे होऊन वाकडे झाले आहे. रसशोषित कीडी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे महागड्या औषधांची फवारणी शेतकर्‍यांनी सुरू केली आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा कायम कांदा पिकाला सर्वाधिक फटका बसत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गतवर्षी काढणी करून साठवलेल्या कांद्याला अतिपावसाचा फटका बसला. बराकीतील कांदा सडून गेल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यंदा देखील तीच परिस्थिती असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news