पुणे : डिजिटल परिवर्तनासाठी भारत सक्षम : राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

पुणे : डिजिटल परिवर्तनासाठी भारत सक्षम : राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारत डीपीआयच्या यशासाठी एक चाचणी केस असून, जगभरातील देश डिजिटल परिवर्तनासाठी भारताकडे पाहू शकतात. भारताने भारत स्टॅक सामायिक करण्यासाठी आर्मेनिया, सिएरा लिओन आणि सुरीनाम या तीन देशांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करीत प्रगतीत भारत पुढे असल्याचे सिद्ध केल्याचे मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केले.

डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपची तिसरी बैठक पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू झाली. उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अर्मेनिया, सिएरा लिओन व सुरीनामच्या मंत्र्यांची उपस्थिती होती. चंद्रशेखर म्हणाले, 'डीपीआय' हे एकच बूट नाही, सर्व मॉडेलमध्ये बसते. शिवाय, खरोखरंच मुक्त स्रोताची शक्ती, भागीदारीची शक्ती आणि सहकार्याची शक्ती वापरणे हे नावीन्यपूर्ण 'डीपीआय' प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी कार्य करते.

त्या देशासाठी आणि लोकांसाठी असून, त्यांनी या दशकाला 'टेकएड' बनविण्यावर भर दिला. भारताने भारत स्टॅक सामायिक करण्यासाठी आर्मेनिया, सिएरा लिओन आणि सुरीनाम या तीन देशांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणात अमलात आणलेले यश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय सचिव अलकेश कुमार शर्मा यांच्यासह सुरीनामच्या रेश्मा कुलदीप सिंग यांनी प्रतिनिधींचे स्वागत करून 3 दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

प्रदर्शन उपयोगी – ग्लोबल डीपीआय प्रदर्शनात डिजिटल आयडेंटिटी, फास्ट पेमेंट, डिजिलॉकर, सॉइल हेल्थ कार्ड, ई-नॅशनल अ‍ॅग्रिकल्चर मार्केट, युनिफाइड मोबाइल अ‍ॅप फॉर न्यू-एज गव्हर्नन्स, डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्क, विमानतळावरील अखंड प्रवासाचा अनुभव यावरील 14 अनुभव झोन दाखवण्यात आले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news