Junnar Nagar Parishad Election Result: जुन्नर नगरपरिषद निवडणूक; शिवसेनेचा भगवा, सुजाता काजळे नगराध्यक्ष

नगराध्यक्षपद व बहुसंख्य जागा शिवसेनेकडे; राष्ट्रवादीला केवळ सहा नगरसेवकांवर समाधान
 Nagar Parishad Election Result
Nagar Parishad Election ResultPudhari
Published on
Updated on

नारायणगाव: जुन्नर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, सुजाता मधुकर काजळे या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या, तर नगरसेवक देखील शिवसेनेचे अधिक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासला या निवडणुकीत फारसे यश आले नाही. नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत आणि केवळ 6 नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग््रेासचे विजयी झाले आहेत. जुन्नर नगरपरिषदेमध्ये शिवसेनेच्या सुजाता मधुकर काजळे या 382 मतांनी विजयी होत नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या आहेत.

 Nagar Parishad Election Result
Saswad Nagar Parishad Election Result: सासवड नगरपरिषद निवडणूक; भाजपची सत्ता कायम, शिवसेनेची मोठी मुसंडी

निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे व कंसात पक्ष आणि मिळालेली मते : प्रभाग क्र. 1 : राजश्री खोंड (शिवसेना/763), मंदार बुट्टे (शिवसेना/688). प्रभाग क्र. 2 : अलका फुलपगार (शिवसेना/ 869), प्रशांत सराईकर (राष्ट्रवादी काँग््रेास/671). प्रभाग क्र. 3 : राहीन कागदी (काँग््रेास/815), अकिफ इनामदार (राष्ट्रवादी काँग््रेास/1 हजार 3). प्रभाग क्रमांक 4 : सुवर्णा जाधव (शिवसेना/ 1 हजार 157), मयूर शिवाजी महाबरे (शिवसेना/ 1 हजार 425). प्रभाग क्रमांक 5 : अनुजा पातूरकर (राष्ट्रवादी काँग््रेास/665), समीर पुरवंत (शिवसेना/660). प्रभाग क्रमांक 6 : अनिल रोकडे (भाजपा/657), वैष्णवी पांडे (अपक्ष/567). प्रभाग क्रमांक 7 : अंजली शिंदे (शिवसेना/559), नरेंद्र तांबोळी (भाजपा/460). प्रभाग 8 : रूपाली परदेशी (शिवसेना उबाठा/528), विक्रम परदेशी (शिवसेना/619). प्रभाग क्रमांक 9 : सना मन्सूरी (राष्ट्रवादी काँग््रेास/986), सय्यद मोहम्मद साकी काशीद (राष्ट्रवादी काँग््रेास/879). प्रभाग 10 : अब्दुल वाजीद इनामदार (राष्ट्रवादी काँग््रेास/788), मुमताज बानो जब्बारखान पटेल (अपक्ष/771)

 Nagar Parishad Election Result
Pune Ward Civic Problems: वॉर्डावॉर्डांत समस्या ‘जैसे थे’; प्रशासनही बेफिकीर

विजयी मिरवणुकीतील जेसीबीवर कारवाई

निवडणुकीतील विजयी मिरवणुका काढताना काही उत्साही कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण्यासाठी आवेशाने आणलेले दोन जेसीबी तसेच ताफ्यामधील कर्णकर्कश आवाजाच्या घंटा पोलिस प्रशासनाने ताब्यात घेतले असून, यावर पुढील कारवाई सुरू आहे.

 Nagar Parishad Election Result
Pune Waste Management Crisis: स्वच्छ पुण्यासाठी नवकल्पनांना संधी द्या

जुन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळे शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला व जागादेखील जास्त निवडून आल्या आहेत. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळणार असून, शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. पक्षप्रमुख तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही जुन्नर नगरपरिषद काबीज करू शकलो.

आ. शरद सोनवणे, शिवसेना नेते

 Nagar Parishad Election Result
Sinhagad Cannon Carriage Inauguration: सिंहगडावर तीन भव्य तोफगाड्यांचे लोकार्पण

या निवडणुकीत निवडून आल्याचे श्रेय मतदार, पक्षाचे कार्यकर्ते आणि पतीची साथ होती. जुन्नरच्या जनतेचे सगळे प्रश्न सोडविण्याचा आणि विकासाचा प्रामाणिक प्रयत्न येत्या पाच वर्षाच्या कालावधीत करणार आहे.

सुजाता काजळे, नवनियुक्त नगराध्यक्ष, जुन्नर नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news