Indapur Accident: अंत्यविधीसाठी गेलेल्या प्रवाशांवर काळाचा घाला; एकाचा मृत्यू तर १३ जण जखमी

जखमींना भिगवण येथील लाईफलाईन हॉस्पिटल सह इंदापूरमधील शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Indapur Accident
अंत्यविधीसाठी गेलेल्या प्रवाशांवर काळाचा घाला; एकाचा मृत्यू तर १३ जण जखमीPudhari
Published on
Updated on

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावच्या हद्दीत गुरुवारी (दि.२१) पहाटे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. जीपने समोरील अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात कर्नाटकातील यल्लावा चौंडकी या ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून १३ प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमींना भिगवण येथील लाईफलाईन हॉस्पिटल सह इंदापूरमधील शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Latest Pune News)

Indapur Accident
Bhimashankar Rain: भीमाशंकर परिसरात विक्रमी 324 मिमी पाऊस

मिळालेल्या माहितीनुसार हे प्रवासी काल पुण्यामध्ये एका ठिकाणी अंत्यविधीसाठी गेले होते.अंत्यविधी उरकल्यानंतर मध्यरात्री ते परत आपल्या गावाकडे कर्नाटकातील विजापूर कडे निघाले होते

दरम्यान पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावच्या परिसरात आज पहाटे पावणेचार वाजता गाडी चालक श्रीकांत कुलगैरी याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या गाडीची पुढील अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक बसली.या भीषण अपघातात प्रवाशांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य १३ जण हे गंभीर आणि किरकोळ जखमी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर आणि पोलीस मदत केंद्राचे इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. इंदापूर मधील काही तरुणांच्या मदतीने आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आलं. काही जखमींना भिगवण येथील लाईफ लाईन हॉस्पिटल तर काहींना इंदापूर मधील उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचारकामी दाखल करण्यात आलं आहे.

Indapur Accident
Seasonal vegetables: पुरंदर किल्ला परिसरात बहरल्या रानभाज्या

जखमींची नावे खालील प्रमाणे.

सागर गणपती जानकर (वय २७)

परशु संगप्पा जानकर (वय ३०)

महादेवी दोहमणी (वय ६०) हे गंभीर जखमी आहेत

रेणका अनिल परानवर (वय ४०)

रामक्का गणपती जानकर (वय ५०) वर्षे महीला (गंभीर जखमी

लक्ष्मी परशु परानवर वय ३५ वर्षे महीला (किरकोळ जखमी)

सुसलवा जानगर वय ६८ वर्षे महीला (किरकोळ जखमी )

मुत्ववा परानवर (वय ६०) (गंभीर जखमी)

सुनंदा परानवर (वय ५०) (गंभीर जखमी)

सविता भिमु परानवर (वय ३५) (किरकोळ जखमी)

सित्तवा परानवर (वय ७०) (किरकोळ जखमी)

श्रीकांत कुलगैरी (वय ३०) (चालक गंभीर जखमी)

गौरवा यलप्पा मनगोळी (वय ५५) व (किरकोळ जखमी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news