पुणे शहरामध्ये ’इन्कोव्हॅक’ लस देण्यास सुरुवात

पुणे शहरामध्ये ’इन्कोव्हॅक’ लस देण्यास सुरुवात
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये महापालिकेच्या केंद्रांवर शुक्रवार (दि.28) पासून 'इन्कोव्हॅक' लस देण्यास सुरुवात झाली. 'इन्कोव्हॅक' ही लस नाकातून दिली जाते. बूस्टर डोस म्हणून या लशीचा वापर होत आहे. अठरा वर्षांपुढील नागरिकांना बूस्टर डोस म्हणून घेता येणार आहे. परंतु, सध्यातरी केवळ साठ वर्षांवरील नागरिकांना ही लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.

पहिल्या दिवशी केवळ दोनच व्यक्तींनी ही लस घेतली आहे. लशीकरण सुरू झाल्याची नागरिकांपर्यंत माहिती न पोहोचल्याने कमी प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी लशीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आगामी दिवसात लशीकरणाचा प्रतिसाद पाहून डोस उपलब्ध करून देण्यात येईल, असे आरोग्य विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

महापालिका आरोग्य विभागाकडील लशींचा साठा 31 मार्चला संपला होता. परिणामी, तेव्हापासून सर्व केंद्रांवरील लशीकरण बंद होते. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने पुन्हा लशीकरण सुरू करण्यासाठी 'इन्कोव्हॅक' लशींची खरेदी केली. राज्य आरोग्य विभागाने महापालिकेला 'इन्कोव्हॅक' लशींचे 512 डोस दिले आहेत. कमी लस उपलब्ध झाल्या आहेत.

या केंद्रावर मिळते लस…

कै. द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना, बोपोडी, डॉ. दळवी रुग्णालय, शिवाजीनगर, कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ, कै. जयाबाई सुतार रुग्णालय, कोथरूड, कै. अण्णासाहेब मगर दवाखाना, हडपसर या केंद्रांवर लस नागरिकांना मिळणार आहे.

थेट केंद्रावर येणार्‍या 50 टक्के नागरिकांना लस देण्यात येत आहे. 'इन्कोव्हॅक' लशीची प्रत्येक केंद्रावर शंभर डोसची व्यवस्था करण्यात आली आहे. लशींच्या साठ्यानुसार 50 टक्के नागरिकांना ऑनलाइन बुकिंग करून लस देण्यात येत आहे.

                                                 – डॉ. सूर्यकांत देवकर,
                                 सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news