शहरात क्रांतिसूर्याच्या विचारांचा जागर

शहरात क्रांतिसूर्याच्या विचारांचा जागर

पुणे : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करणारे नागरिक आणि विविध व्याख्यानांमधून झालेला फुले विचारांचा जागर, असे वातावरण मंगळवारी महात्मा फुलेवाड्यात पाहायला मिळाले. क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वाड्यात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अभिवादनासाठी आलेल्या लोकांनी वाडा फुलून गेला होता. प्रत्येकाने फुले यांच्या कार्याला सलाम केला.

गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा फुलांनी सजविला होता. फुले यांचे घर, समाधिस्थळ आणि संपूर्ण परिसराला एक वेगळेच रूप प्राप्त झाले होते. विविध संस्था-संघटनांकडून येथे कार्यक्रम आयोजिले होते. या कार्यक्रमातही नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत नागरिकांनी त्यांना अभिवादन केले. महात्मा फुले यांचे घर, त्याचे अंगण, विहीर अशा विविध गोष्टी पाहताना लहान मुले आनंदी दिसले. पुस्तक विक्रीचे स्टॉलही लावण्यात आले होते. काहींनी फुले दाम्पत्याचे कार्य आपल्या मनोगतातून पोहचविण्याचा प्रयत्न केला. अनेक मान्यवरांनीही वाड्याला भेट देत अभिवादन केले. मान्यवरांनी आपल्या विचारांमधून महात्मा फुले यांच्या कार्याला उजाळा देत आजच्या काळात त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news