जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या | पुढारी

जळगाव जिल्ह्यात दोन लाख ५० हजार रुपयांच्या चोऱ्या

जळगाव : जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चोरट्यांनी कापसाच्या गोण्या, मशीन, जनावरे, मोटरसायकल अशा विविध मुद्देमालाच्या चोऱ्या करून दोन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

वरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शेतकरी उदय नारायणराव देशमुख यांच्या शेतात असलेल्या शेडचे कुलूप तोडून त्यामधून २४ हजार रुपयांच्या कापसाच्या गोण्या व सहा हजार रुपयांच्या कोंबड्या सावतर शिवारामधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भिलाली या गावातील शेतकरी भाऊराव पाटील यांच्या ८० हजार रुपये किमतीच्या म्हशी व जर्सी गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी पारोडा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून संदीप सातपुते हे पुढील तपास करीत आहेत.

कासोदा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बीएसएनएल कार्यालय मधून पावर प्लांट बॅटरी रूम मधील कम्युनिटी कॉपर प्लेट, पियुज पासून बॅटरी जाणाऱ्या चार कॉपर वायर, ओल्ड पावर प्लांट कॉपर प्लेट्स व अन्य दोन वायरी असे अज्ञात चोरट्यांनी २९ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सहदेव घुले हे करीत आहेत.

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 220 केवी सबस्टेशन चाळीसगाव येथून 45 हजार 955 चे पाच तांब्याचे रोड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. याप्रकरणी सुरक्षारक्षक रवींद्र सोनवणे यांनी दिलेले फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना भूषण पाटील करीत आहेत. तर जिल्ह्यातील चाळीसगाव आढावा भुसावळ तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत ६५ हजार रुपये किमतीच्या मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या प्रकरणी या तीनही पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

Back to top button