Pune : पारगाव पोलिसांची अवैध धंद्यांवर कारवाई

file photo
file photo

मंचर : पुढारी वृत्तसेवा : पारगाव (ता. आंबेगाव) येथे पारगाव पोलिसांनी सोमवारी (दि. 27) तीन ठिकाणी अवैध धद्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 5 हजार 245 रुपयांची देशी व हातभट्टीची दारू जप्त केली असून, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पारगावच्या महिला पोलिस अंमलदार निशा गुळवे यांनी दिली. पारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत इंडियन ऑइल कारखाना पेट्रोलपंप तसेच सानिका हॉटेलमागे अवैधरीत्या देशी दारू व हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची माहिती पारगाव पोलिसांना समजली होती. पोलिसांनी सायंकाळी घटनास्थळी जाऊन छापा मारला असता, दीपाली बाबाजी चौगुले (वय 35, रा. पारगाव, ता. आंबेगाव) हिच्याकडे 1 हजार रुपये किमतीची 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली आहे.

संबंधित बातम्या :

तसेच सुरज दत्तात्रय बोखारे (वय 20, रा. पारगाव, ता. आंबेगाव) याच्याकडे एक हजार रुपये किमतीची दहा लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली आहे. तर सानिका हॉटेलच्या पाठीमागे दीपाली आनंदा भोसले (वय 30, रा. पारगाव, ता. आंबेगाव) हिच्याकडे 3 हजार 245 रुपयांची देशी व हातभट्टीची दारू मिळून आली आहे. पारगाव पोलिसांनी 5 हजार 245 रुपयांची दारू जप्त केली असून, तिघांवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारगावचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मडके तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news