पुणे : लॉकडाऊनमुळे शहर ठप्प असतानाही कचरावाहतुकीसाठी दिले 10 कोटी

पुणे : लॉकडाऊनमुळे शहर ठप्प असतानाही कचरावाहतुकीसाठी दिले 10 कोटी
Published on
Updated on

पांडुरंग सांडभोर

पुणे : लॉकडाऊनमध्ये सर्व पुणे शहर ठप्प असताना कचर्‍यांचे प्रमाणही तब्बल 40 ते 45 टक्क्यांनी घटले होते. मात्र, घरोघरी कचरा वाहतूक करणार्‍या स्वयंभू ठेकेदाराच्या बिलात या कालावधीत घट होण्याऐवजी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीतही 10 कोटींची बिले ठेकेदाराला दिली गेली आहेत.

मार्च 2020 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली आणि 23 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. जवळपास सुरुवातीचे दोन महिने तर कडकडीत लॉकडाऊन होता. संचारबंदीमुळे नागरिकांना बाहेरही पडता येत नव्हते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद होती. हजारो कुटुंबीय शहर सोडून आपापल्या गावी गेले होते. त्यामुळे शहरातील कचर्‍यांच्या प्रमाणात तब्बल 40 ते 45 टक्क्यांची घट झाली असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा विभागाकडून देण्यात आली.

असे असताना कचरा वाहतुकीचा ठेका असलेल्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट या ठेकेदाराचे काम आणि बिले दोन्ही कमी झाले नसल्याचे माहिती अधिकारातून उजेडात आला आहे. गेल्या पाच वर्षांतील मार्च ते जुलै या पाच महिन्यांच्या बिलांची सरासरी बघितल्यानंतर कोरोनाच्या काळातही कचरा वाहतुकीची 'कशी ही बनवाबनवी ठेकेदाराने केली' हे उघड होत आहे.

वर्षनिहाय फुगत गेली बिलांची आकडेवारी

मार्च ते जुलै 2016 या कालावधीत 1 कोटी 66 लाखांची बिले अदा केली होती. याच कालावधीत 2017 मध्ये हा आकडा 4 कोटी 14 लाख, 2018 मध्ये याच पाच महिन्यांत 6 कोटी 85 लाख, 2019 मध्ये 10 कोटी 20 लाख व फेर्‍यांची संख्या होती 55 आणि मार्च ते जुलै 2020 या कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत झालेल्या फेर्‍यांची संख्या होती 54 आणि तब्बल 10 कोटी 11 लाख इतक्या रकमेची बिले या कालावधीसाठी अदा केली गेली. विशेष म्हणजेच झालेल्या फेर्‍यांची 2019 म्हणजेच कडकडीत लॉकडाऊन असतानाही कचरा वाहतुकीच्या बिलात अजिबात घट झाली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नक्की कसल्या कचर्‍याची वाहतूक गेली, असा प्रश्न उपस्थित झाला.

जीपीआरएस लॉग नसताना रक्कम अदा

निविदांमधील करारानुसार ठेकेदाराने सादर केलेल्या बिलांसमवेत लॉगबुक आणि जीपीआरएस लॉग जमा केल्यानंतरच बिले अदा करण्याची अट आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात महापालिकेच्या जीपीआरएसमध्ये कचरा वाहतुकीच्या फेर्‍या दिसत नसतानाही कोट्यवधींची बिले अदा केली गेली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news