पिंपरी : वल्लभनगर बस स्थानकात अस्वच्छता असल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्थानकात अनेक ठिकाणी कचरा पडलेला असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. स्थानकातील पिण्याचे पाणी तीन ठिकाणी उपलब्ध आहे. त्यातील दोन ठिकाणच्या पिण्याचे पाणी बंद आहे. त्याचप्रमाणे स्थानकामध्ये एका ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध असून, त्या नळाभोवती शेवाळे जमा झाले असल्यामुळे ते अस्वच्छ दिसत आहे. त्यामुळे प्रवासी येथील अस्वच्छ पाणी पिऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.