पुणे : अवैध प्रवासी वाहतूक ‘सुसाट’ ; खासगी कार, ट्रक, टँकर चालकांकडून नियम धाब्यावर

पुणे : अवैध प्रवासी वाहतूक ‘सुसाट’ ; खासगी कार, ट्रक, टँकर चालकांकडून नियम धाब्यावर
Published on
Updated on

प्रसाद जगताप : 

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर मोटार वाहन कायद्यातील नियमांची ऐशी-तैशी करत, सर्रास अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. खासगी कार (पांढर्‍या नंबर प्लेट), ट्रक, टँकर यांसारख्या वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र, याकडे महामार्ग पोलिस व आरटीओ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. महामार्गावरील वाढते अपघात आणि येथे होत असलेल्या उपाययोजनांची दै. 'पुढारी'कडून सोमवारी (दि. 13) प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या वेळी सर्रासपणे नियमांना फाटा दिला जात असल्याचे दिसून आले. अनेक खासगी कारमधून पुणे-मुंबई-सातारा अशी अवैध प्रवासी वाहतूक होत आहे. त्यासोबतच महामार्गावरून मालवाहतूक करणार्‍या ट्रक आणि टँकरसारख्या वाहनांमधूनही प्रवासी वाहतूक होत आहे.

महामार्गावरील लेनच्या नियमांचे उल्लंघन
महामार्गावरून धावणार्‍या अवजड वाहनांकडून महामार्गावरील नियमांचे अजिबात पालन होत नाही. एकाच वेळी तीन-तीन ट्रक महामार्गावरील तिन्ही लेनमधून जाताना दिसतात. अवजड वाहनचालकांकडून लेनची शिस्त पाळली जात नाही.

या ठिकाणी होते अवैध प्रवासी वाहतूक
कात्रज बायपासच्या सुरुवातीला, पुणे स्टेशन परिसरात, वडगाव पूल, धायरी, चांदणी चौक, बावधान, बालेवाडी, वाकड परिसर, एक्सप्रेस वेच्या सुरुवातीला, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर, सातार्‍याच्या दिशेला खेड-शिवापूर, नसरापूर, कापूरव्होळ, सारोळ्यासह ठिकठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news