IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरची आई मनोरमा हिच्याविरुद्ध गुन्हा, अपहरण प्रकरणाच्या तपासात अडथळा आणणं भोवलं

चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद : ट्रकचालकाचे अपहरण करणाऱ्या कारचालकाला पसार होण्यास केली मदत
IAS Pooja Khedkar
मनोरमा खेडकर File Photo
Published on
Updated on

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित झालेली पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर हिच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक खरात यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मनोरमा दिलीप खेडकर (वय 48, रा. नॅशनल हौसिंग सोसायटी, बाणेर) हिच्यासह साथीदारांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 221, 238, 253 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IAS Pooja Khedkar
Puja Khedkar : वादग्रस्त पूजा खेडकरचे 'नॉन क्रिमिलेअर' प्रमाणपत्र रद्द

नवी मुंबईत एका शनिवारी सायंकाळी ट्रक मोटारीला घासून गेल्याने वाद झाला. कारचालकाने ट्रकचालकाला धमकावून त्याला कारमधून अपहरण केले, अशी फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांचे पथक रविवारी (दि. 14 सप्टेंबर) खेडकर यांच्या बंगल्यात दुपारी दीडच्या सुमारास पोहचले. खेडकर यांच्या बंगल्यात चौकशीसाठी गेले. मनोरमा खेडकर हिने बंगल्याचा दरवाजा उघडला. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक खरात यांनी त्यांना गुन्ह्याची माहिती दिली. खेडकर यांना तपासात मदत करण्यास सांगितले. तेव्हा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा बंद करून घेतला, असे सहायक पोलिस निरीक्षक खरात यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची माहिती चतु:शृंगी पोलिसांना दिली. चतु:शृंगी पेलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत खेडकर यांनी ट्रकचालकाचे अपहरण करणारा कारचालक आरोपी याला पसार होण्यास मदत केली. आरोपी कार घेऊन पसार झाला. पोलिसांनी चौकशीत सहकार्य केले नाही तसेच बंगल्यात त्यांनी पाळीव श्वान सोडून पोलिसांना चौकशीसाठी अटकाव केला, असे खरात यांनी म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिमंडल-४ चे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपहरण करण्यात आलेल्या ट्रकचालकाची नवी मुंबई पोलिसांनी सुटका केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

IAS Pooja Khedkar
Pooja Khedkar Case | पूजा खेडकरांच्या वडिलांविरोधात पोलिसात तक्रार अर्ज दाखल

बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक

पूजा खेडकर यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत बनावट कागदपत्रे सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात त्यांची चौकशी झाली होती. त्यानंतर बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

शेतकऱ्याला पिस्तुलाचा दाखविला होता धाक

मनोरमा यांनी मुळशी तालुक्यातील एका शेतकर्‍याला जमिनीच्या वादातून पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर पौड पोलिस ठाण्यात मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news