Monsoon Update| आज-उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्याला 'रेड अलर्ट'

राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाने हजेरी लावली.
Rain Update, Rain Alert
आज-उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्याला 'रेड अलर्ट'File Photo
Published on
Updated on

पुणे : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र अन् घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरू आहे. या भागाला १५ व १६ जुलै रोजी रेड, तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, राज्यात १८ जुलैपर्यंत सर्वदूर मुसळधार ते मध्यम पाऊस सुरू राहणार आहे.

Rain Update, Rain Alert
आयुष रुग्णालय सातार्‍यासाठी कोसो दूरच

शनिवारपासून राज्यात सर्वत्र मुसळधार ते मध्यम पावसाला सुरुवात झाली असून, १८ जुलैपर्यंत पावसाचा रोज कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. घाटमाथ्यावर पर्यटनाला जाताना सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अतिवृष्टीची ठिकाणे (२०० मि.मी.पेक्षा जास्त) पेण २२१, पाली २१७, माथेरान २१६, पेडणे २१०, तळा २८०, वाडा २७०, मंडणगड २५०, लोणावळा २४१, घाटमाथा : ताम्हिणी ३१५, डुंगरवाडी २६४, भिरा २२७, अंबोणे, दावडी २२२, खोपोली २००

Rain Update, Rain Alert
जिल्ह्यात धो-धो सुरूच

असे आहेत अलर्ट...

  • रेड अलर्ट: कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा (१५ व १६ जुलै)

  • ऑरेंज अलर्ट विदर्भ (१५ व १६ जुलै)

  • येलो अलर्ट: मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र (१५ व १६ जुलै)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news