Nifty 50 ची विक्रमी घौडदौड कायम! पहिल्यांदाच २४,६५० वर

सेन्सेक्सही तेजीत, हे शेअर्स टॉप गेनर्स
NSE Nifty 50
निफ्टीने आज सुरुवातीला पहिल्यांदाच २४,६५० च्या अंकाला स्पर्श केला.NSE

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक बाजारातील मजबूत संकेतांदरम्यान भारतीय शेअर बाजार मंगळवारी (दि.१६) तेजीत खुला झाला. विशेष म्हणजे निफ्टी ५० ने आज पुन्हा नवा उच्चांक नोंदवला. निफ्टीने (Nifty 50) आज सुरुवातीला पहिल्यांदाच २४,६५० च्या अंकाला स्पर्श केला. तर सेन्सेक्सने सुरुवातीला सुमारे १५० अंकांनी वाढून ८०,८०० वर व्यवहार केला.

जुलैमध्ये Nifty 50 चा ८ सत्रांमध्ये विक्रमी उच्चांक

निफ्टी ५० ने जुलैमध्ये आतापर्यंत १२ पैकी ८ सत्रांमध्ये विक्रमी उच्चांक नोंदवला आहे.निफ्टी ५० वर भारती एअरटेल, बीपीसीएल, कोल इंडिया, अदानी एंटरप्रायजेस, टाटा स्टील हे शेअर्स तेजीत आहेत. तर श्रीराम फायनान्स, पॉवर ग्रिड, एलटी, कोटक बँक या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

NSE Nifty 50
Stock Market Opening Bell : शेअर बाजारात ‘तेजी’ची धूम कायम, सेन्सेक्स-निफ्टीने केला नवा विक्रम

सेन्सेक्सवर भारती एअरटेल, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस हे शेअर्स तेजीसह खुले झाले आहेत. तर कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, एलटी, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.

Bajaj Auto शेअर्स फोकसमध्ये

बजाज ऑटोचा शेअर्स आज फोकसमध्ये असणार आहे. कारण ही कंपनी त्याचे पहिल्या तिमाहीतील कमाईचे आकडे आज जाहीर करणार आहे.

NSE Nifty 50
Railway stocks | गुंतवणूकदार सुखावले! 'या' रेल्वे शेअर्सनी पकडला बुलेट ट्रेनचा वेग, १५ टक्क्यांपर्यंत वाढ

क्षेत्रीय निर्देशांकांत कोण आघाडीवर?

क्षेत्रीय निर्देशांकांत रियल्टी, मेटल आणि एनर्जी शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. तर हेल्थकेअर, फार्मा आणि आयटीमध्ये घसरण झाली आहे. आयटीमधील एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि विप्रो यांचे शेअर्स घसरले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news