IAS Officer Pooja Khedkar| दिलीप खेडकर यांची मालमत्ता एसीबीच्या रडारवर

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालमत्तेची नगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे.
IAS Officer Pooja Khedkar
IAS Officer Pooja KhedkarFile Photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालमत्तेची नगर जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. आता त्याच अनुषंगाने पुणे लाचलुचपत विभागाने देखील खेडकर यांच्या पुण्यातील मालमत्तेची चौकशी करण्याचा अहवाल मुंबई एसीबीच्या मुख्य विभागाला पाठविला आहे. (IAS Officer Pooja Khedkar)

IAS Officer Pooja Khedkar
Chhatrapati Sambhajinagar Crime News | संभाजीनगरमधील वडगाव-तिसगाव हादरले! तरुणाची गोळ्या घालून हत्या

त्यानुसार खेडकर यांच्या पुण्यातील मालमत्तेची चौकशी होऊ शकते. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुषंगाने मुंबईला खेडकर यांच्या मालमत्तेबाबतचा अहवाल पाठविल्याची माहिती अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली.

पूजा खेडकर यांचा लाल दिव्याचा मोह आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यापर्यंत जाऊन पोहचला आहे. तर, पौड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दिलीप खेडकर फरार आहे.

IAS Officer Pooja Khedkar
Uttam Kamble Cong Leader | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे यांचे निधन

पूजा खेडकर यांनी मिळविलेल्या नॉन-क्रिमेलिअर आणि त्यांची हाय प्रोफाईल लाईफ कोट्यवधींची मालमत्ता यानिमित्ताने पुढे आली. दरम्यान, दिलीप खेडकर हे सरकारी खात्यातून निवृत्त झाले आहेत.

त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आहे का? यादृष्टीने एसीबीने त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे एसीबीच्या चौकशीत नेमके काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news