वडगाव-तिसगाव रस्त्यावर तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.Pudhari photo
छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar Crime News | संभाजीनगरमधील वडगाव-तिसगाव हादरले! तरुणाची गोळ्या घालून हत्या
वडगाव-तिसगाव रस्त्यावर तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
छत्रपती संभाजीनगर : येथील वडगाव-तिसगाव रस्त्यावर तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कपिल सुदाम पिंगळे (वय २८, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
(Chhatrapati Sambhajinagar Crime News)
आठ दिवसांपूर्वी ११ जुलै रोजी याच भागात शैलेश विठ्ठल दौंड (वय ३०, रा. आर. एच. ३१, एफडीसी हौ. सो. बजाजनगर) या तरुणाचा दगडाने डोके ठेचून खून करण्यात होता. घटनास्थळी पाहणी करतांना सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस उपनिरिक्षक संदीप शिंदे, अशोक इंगोले आदी

