Uttam Kamble Congress Leader | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे यांचे निधन

राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते उत्तमराव कांबळे यांचे निधन
Senior Congress leader Uttamrao Elia Kamble
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव एलिया कांबळेpudhari news network

नाशिक : नगरपालिका ते महापालिका सलग सातवेळा निवडून येणाचा विक्रम नावावर असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी सभापती आणि जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक उपाध्यक्ष उत्तमराव एलिया कांबळे (८४) यांचे गुरुवारी (दि. १८) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी नगरसेवक समीर (जॉय) कांबळे यांचे ते वडील होत. राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात कांबळे यांचा मोठा नावलौकिक होता. नाशिक नगरपालिकेत १९६७ मध्ये ते सर्वप्रथम नगरसेवकपदी निवडून आले होते. १९६९ मध्ये उपनगराध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. प्रशासकीय कारकीर्दीनंतर १९९२ मध्ये महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये १९९२ व १९९३ मध्ये ते सलग दोन वर्षे त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले. २००४ आणि २००५ मध्येही ते स्थायी समितीचे सभापती होते. महापालिकेत प्रदीर्घ काळ त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले.

नाशिकच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा

सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहर बससेवा चालविण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी परिवहन समिती गठीत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी व्यापारी संकुलांची उभारणी करण्याची संकल्पना कांबळे यांनी रूजवली. नाशिकच्या सहकार क्षेत्रात मानाचे पान समजल्या जाणाऱ्या जनलक्ष्मी बँकेचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते. बँकेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत खा. माधवराव पाटील यांच्या सोबत त्यांनी प्रदीर्घ काळ सहकार क्षेत्र गाजवले. २०१७ मध्ये त्यांनी राजकारणातून तर २०२२ मध्ये सहकार क्षेत्रातून सन्यास घेत त्यांनी पूत्र समीर कांबळे यांच्याकडे राजकारण आणि सहकार क्षेत्राचा वारसा सोपविला. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शरणपूर गाव येथील निवासस्थानी त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर संत आंद्रीया चर्च येथे धार्मिक विधी केल्यानंतर ख्रिश्चन दफनभूमीत त्यांचा दफनविधी केला जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news