अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू; खामुंडी जवळच्या बदगी घाटातील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू; खामुंडी जवळच्या बदगी घाटातील घटना
Published on
Updated on

ओतूर; पुढारी वृत्तसेवा: खामुंडी जवळच्या बदगी घाटात बुधवारी (दि. 14) रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस जागीच ठार झाले.  याबाबतची माहिती गुरुवारी (दि. 15) खामुंडी येथील कैलास बोडके यांनी ओतूर विभागाचे वनपाल सुधाकर गिते यांना दिली असता त्यांनी जुन्नरचे सहायक वनसंरक्षक अमित भिसे व ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक परसराम खोकले, वनसेवक फुलचंद खंडागळे, किसन केदार, गंगाराम जाधव यांच्या मदतीने तातडीने घटनास्थळी जाऊन मृत तरस ताब्यात घेतले. रात्री भक्षाच्या शोधात रस्ता भरकटल्यामुळे अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

हा मृत तरस सुमारे अंदाजे दीड वर्षाचा नर जातीचा असून त्याचे शवविच्छेदन उदापूर रोपवाटिका येथे खामगावचे पशुवैद्यकीय अधिकारी (श्रेणी एक) डॉ. शशिकांत डुंबरे यांनी केले. नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कारदेखील करण्यात आल्याची माहिती वनपाल सुधाकर गिते यांनी दिली आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी वाहन चालविताना वन्यजीवांची काळजी घेऊन वाहन चालविण्याचे आवाहन ओतूर वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news