![Husband-wife Dead : वडगाव काशिंबेग फाट्याजवळच्या अपघातात पती-पत्नी ठार](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F11%2F7-28.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मंचर: पुढारी वृत्तसेवा
मंचर-घोडेगाव रस्त्यावरील वडगाव फाट्यानजीक भीमाशंकर हॉस्पिटलसमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीचा मृत्यू (Husband-wife Dead) झाल्याची घटना रविवारी (दि. २८) दुपारी घडली आहे. याबाबत सावता दत्तात्रय नाईक (वय ३०, रा. नारोडी, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी यांचे चुलतभाऊ एकनाथ बबनराव नाईक (वय ४७) व भावजय संगीता एकनाथ नाईक (वय ४२, दोघेही रा. नारोडी, ता. आंबेगाव) दुचाकीवरून (एमएच १४ डीक्यू ५६०४) या दुचाकीवरून नारोडीगावी येत असताना त्यांना भीमाशंकर हॉस्पिटलसमोर अज्ञात वाहनाने पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली. (Husband-wife Dead)
या अपघातात संबंधित पती-पत्नीच्या पोटावरून या वाहनाचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
स्थानिक नागरिकांनी त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. एकनाथ नाईक उपचारापूर्वीच मृत झाले, तर संगीता नाईक यांच्यावर उपचार सुरू असताना त्या मृत झाल्या.
एकनाथ नाईक चाकण येथील महिंद्रा कंपनीत कामाला होते. रविवारची सुटी असल्याने ते आपल्या गावी पत्नीबरोबर जात असताना हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा :