दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मी गेल्या दीड महिन्यांपासून ससून रुग्णालयात हेलपाटे घालत आहे. माझा मुलगा दिव्यांग असून त्याचा बस पास तसेच इतर सवलतींसाठी प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र ससूनमध्ये आल्यावर वेबसाईट बंद असल्याचे सांगून वारंवार परत पाठवण्यात येत आहे. ससूनमध्ये अनेकाना दिव्यांग प्रमाणपत्रे मिळाली नाहीत.– एकनाथ ढोले, नागरिकडॉक्टरांनी माझ्या आईची एमआरआय तपासणी करायला सांगितली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये आठ ते दहा हजार रुपये खर्च सांगितला आहे. माझी आर्थिक परिस्थिती नसल्याने मी आईला घेऊन दोन आठवड्यांपूर्वी ससूनमध्ये आलो होतो. पेशंट वेटिंगवर असल्याने त्यांनी मला दोन आठवड्यानंतर येण्यास सांगितले. गुरुवारी रुग्णालयात आल्यावर पुन्हा चार दिवसानंतरची तारीख देण्यात आली आहे.– मनोज जाधव, रुग्णाचे नातेवाईक
हेही वाचा