Pune Music Shows: 'वैकुंठीचा राया' पुण्यात भक्तिरसाची स्वरमैफल; कार्यक्रम कधी- कुठे?

pune classical music events: ‘पुढारी’ माध्यम समूहाचा विशेष उपक्रम; बालगंधर्व रंगमंदिरात संतसाहित्य, अभंगगायन आणि विठ्ठलभक्तीचा अनोखा संगम
Vaikunthicha Raya
Vaikunthicha RayaPudhari
Published on
Updated on

Vaikunthichya Raya Pune Classical Music Event

पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सध्या श्रीविठ्ठलनामाच्या गजरात आणि भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. या भक्‍तिमय वातावरणात आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत संतसाहित्याचा आणि विठ्ठलभक्तीचा गोडवा रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्येष्ठ गायक पं. यादवराज फड आणि गायक सुनील पासलकर यांचा 'वैकुंठीचा राया' हा विशेष सांगीतिक कार्यक्रम मंगळवारी (दि. २१ जुलै) आयोजित केला आहे. 'पुढारी' माध्यम समूहाने आयोजित केलेल्या, विशाल चुगेरा प्रॉपर्टीजने प्रस्तुत केलेल्या आणि सणस ग्रुप समर्थित (पॉवर्ड बाय) असलेल्या या भक्तिरसाने भिजलेली अभंग मैफल सायंकाळी पाच वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात रंगणार आहे.

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेले आणि किराणा घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेले ज्येष्ठ गायक पंडित यादवराज फड हे आपल्या सुरेल, भावपूर्ण आणि रागदारीने समृद्ध अशा गायकीतून संतांचे निवडक अभंगांचे सादरीकरण करणार आहेत. त्यांच्या सुरेल स्वरांतून संतवाङ्मयातील अध्यात्म, भक्ती, समर्पण आणि मानवतेचा संदेश रसिकांपर्यंत पोहोचणार आहे, तर गायक सुनील पासलकर हेही काही अभंग सादर करणार आहेत.

Vaikunthicha Raya
Ashadhi wari 2026: तुकोबांच्या पालखीचा पहिला विसावा अनगडशाह बाबा दर्ग्यात, काय आहे इतिहास?

शास्त्रीय संगीताची अभिजात परंपरा आणि वारकरी संप्रदायातील भक्तिभाव यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून घडणार असून, कार्यक्रमाचे प्रभावी निरूपण ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे करणार आहेत. कोहिनूर ग्रुप आणि फोनिक्स लॅण्डमार्क हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. के. जे. ग्रुप हे को-पॉवर्ड बाय पार्टनर असून, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (मल्टीस्टेट) हे फायनान्स पार्टनर आहेत. चाटे ग्रुप एज्युकेशन पार्टनर, तर पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) हे डेअरी पार्टनर आहेत.

या विशेष मैफिलीत विविध संतांच्या निवडक अभंगांचे सादरीकरण होणार आहे. संतांच्या रचनांमधून भक्ती, समता, मानवता, समाजप्रबोधन आणि ईश्वरनिष्ठ जीवनाचा संदेश दिला जातो. या अभंगांना पं. यादवराज फड हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत स्वरबद्ध करून सादर करणार आहेत. पं. फड यांनी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात दीर्घकाळ साधना केली असून, किराणा घराण्याच्या समृद्ध परंपरेचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला आहे. त्यांच्या प्रत्येक सादरीकरणात संगीताची अभिजातता आणि भक्तिभावाचा ओलावा यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो. त्यामुळे 'वैकुंठीचा राया' ही मैफल केवळ संगीताचा कार्यक्रम न राहता भक्ती, अध्यात्म आणि संतपरंपरेचा भावस्पर्शी अनुभव देणारी ठरणार आहे.

गायक सुनील पासलकर हेही आपल्या मधुर स्वरांतून निवडक अभंग सादर करणार असून, कार्यक्रमाचे प्रभावी आणि अभ्यासपूर्ण निरूपण ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र खरे करणार आहेत. प्रत्येक अभंगामागील आध्यात्मिक आशय, संतांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे सामाजिक महत्त्व त्यांच्या निरूपणातून उलगडणार आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संतांच्या विचारांचा आणि श्रीविठ्ठलभक्तीचा संदेश अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. शास्त्रीय संगीत, अभंगगायन, संतसाहित्य आणि वारकरी परंपरेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक रसिकांसाठी ही मैफल एक अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.

Vaikunthicha Raya
Ashadhi Wari: वारी आली आनंदाची... लेवून परंपरा भक्तीची!

कार्यक्रम कधी-कुठे?

  • दिनांक : मंगळवार, २१ जुलै

  • वेळ : सायंकाळी ५ वाजता

  • स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, पुणे

कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका येथे मिळतील

  • दैनिक पुढारी कार्यालय, मित्रमंडळ चौक - सकाळी १० ते सायं. ६.

  • देसाई बंधू आंबेवाले, कर्वे रस्ता

  • ग्राहक पेठ, टिळक रस्ता

  • अमराळे ज्वेलर्स, कुंटे चौक, लक्ष्मी रस्ता

  • मोदीकेअर दालन, सक्सेस स्क्वेअर सोसायटी, महर्षी कर्वे पुतळ्याजवळ, कोथरूड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news