पुणे रेल्वे स्थानकातून उच्चशिक्षित गुजराती तरुण बेपत्ता

पुणे रेल्वे स्थानकातून उच्चशिक्षित गुजराती तरुण बेपत्ता
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकातून उच्चशिक्षित तरूण बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली. यानंतर काही दिवसांनी अल्पवयीन मुलाचे अपहरणही झाले होते. या घटना ताज्या असतानाच आता उच्चशिक्षित गुजराती तरुण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. अल्केश रमेशभाई व्यास (वय ३६, रा.राजकोट गुजरात) असे बेपत्ता असलेल्या तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात अल्केश व्यास याचे मेहुणे भार्गव जोशी यांनी याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

चार दिवसांपुर्वी हा तरूण पुण्यात मुलाखत देण्यासाठी आला होता. रेल्वे पोलीस आणि लोहमार्ग पोलीस या तरूणाचा शोध घेत आहेत. मात्र, हा तरूण रेल्वे स्थानकाबाहेर आणि कोणत्याही रेल्वे गाडीत चढला नसल्याचे सीसीटिव्हीत दिसत आहे. अल्केश व्यास हा बुधवारी (दि. ८) रोजी पुण्यात टीसीएस कंपनीत मुलाखत देण्यासाठी आला होता. रात्री ११.२० वाजता तो पुणे स्थानकावर आला. पुणे स्थानकावरील डोअरमेट्री येथे त्याने चेक इन केले आणि दुसर्‍या दिवशी चेक आऊट सकाळी 6 वाजता केले. मात्र, त्यानंतर हा तरूण येथून गायब झाला. दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस आणि लोहमार्ग पोलिस यांनी त्याचा सीसीटिव्हीच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो स्थानकातून बाहेर जाताना आणि रेल्वे गाड्यांमध्ये चढून जाताना लावण्यात आलेल्या कोणत्याही सीसीटिव्हीमध्ये दिसला नाही. मग हा तरूण गेला कुठे? असा प्रश्न सध्या त्याच्या कुटूंबियांना पडलेला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहेत.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news