Hepatitis Day: गर्भवतींना पावसाळ्यात हिपॅटायटीस संसर्गाचा धोका

दूषित पाणी आणि स्वच्छतेचा अभाव ही प्रमुख कारणे : यकृताचा दाह होणारा आजार
Hepatitis Day
गर्भवतींना पावसाळ्यात हिपॅटायटीस संसर्गाचा धोकाPudhari
Published on
Updated on

Hepatitis in pregnancy

पुणे: पावसाळ्याच्या काळात दूषित अन्न व पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः गर्भवती महिलांसाठी हा काळ अधिक संवेदनशील मानला जातो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हिपॅटायटीसच्या संसर्गाची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते.

हिपॅटायटीस हा यकृताचा दाह होणारा आजार विषाणूंमुळे होतो. पावसाळ्यात दूषित पाणी आणि स्वच्छतेचा अभाव ही हिपॅटायटीसची प्रमुख कारणे असल्याचे डॉक्टर सांगतात.गर्भवती महिलांना विशेषतः तिसर्‍या तिमाहीत, हिपॅटायटीस ‘ई’चा संसर्ग होण्याचा धोका असतो. (Latest Pune News)

Hepatitis Day
Pune News: ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’भोवले; ‘एसटी’चे चार चालक बडतर्फ

यकृत निकामी होणे, अकाली प्रसूती किंवा गर्भावर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. हिपॅटायटीस ‘ए’मुळे डिहायड्रेशन, दीर्घकाळ आजार आणि उपचार न केल्यास गुंतागुंत होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान कोणत्याही विषाणुसंसर्गाचा शरीरावर अधिक गंभीर परिणाम होऊ शकतो. हिपॅटायटीस संसर्गामुळे तीव्र थकवा, मळमळ आणि पोटात अस्वस्थता येऊ शकते. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

गर्भवतींसाठी धोका का वाढतो?

  • गर्भावस्थेत रोगप्रतिकारकशक्ती काही प्रमाणात कमी झालेली असते. त्यामुळे संसर्ग झपाट्याने होतो.

  • हिपॅटायटीस ई गर्भवतींसाठी अतिशय धोकादायक असून, यामुळे गर्भपात किंवा अकाली प्रसूती होण्याची शक्यता असते.

  • काही प्रकरणांमध्ये आईकडून बाळामध्ये संक्रमण होऊ शकते.

Hepatitis Day
Baramati Accident Update: मुलगा आणि दोन नातीच्या मृत्यूनंतर राजेंद्र आचार्य यांचेही निधन ; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

काय काळजी घ्यावी?

  • उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच प्या

  • फळे व भाज्या नीट धुऊन वापरा

  • सार्वजनिक टॉयलेटचा वापर करताना स्वच्छतेची काळजी घ्या

  • लसीकरणाची पूर्तता करून घ्या

  • कच्चे आणि कमी शिजवलेल्या पदार्थांचे सेवन टाळा. ताजे, योग्यरीत्या शिजवलेले, स्वच्छ आणि गरम अन्नाचे सेवन करा.

  • जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

  • पावसाळ्यात नियमित प्रसूतीपूर्व तपासणी करून घ्या.

... या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • अत्यंत थकवा येणे

  • मळमळ आणि उलट्या

  • डोळे आणि त्वचा पिवळी पडणे (कावीळ)

  • लघवीचा रंग गडद होणे

  • फिकट रंगाचे मल

  • ताप येणे आणि भूक न लागणे

  • भूक मंदावणे

  • पोटदुखी, मळमळ

गरोदरपणात सर्वच बाबींची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्याहूनही अधिक इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात अधिक सावध राहणे गरजेचे आहे. गर्भवती माता महत्त्वाच्या टप्प्यात हिपॅटायटीस संसर्ग टाळू शकतात आणि निरोगी जीवनशैली जगू शकतात.

- डॉ. पद्मा श्रीवास्तव, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ

गर्भवतींनी स्वच्छ पाणी आणि अन्नाचे सेवन करावे. सार्वजनिक ठिकाणी जेवण टाळावे आणि नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी. हिपॅटायटीस बीविरुद्ध लस उपलब्ध आहे, ती वेळेत घ्यावी.

- डॉ. स्मिता काकडे, स्त्रीरोगतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news