Baramati Accident Update: मुलगा आणि दोन नातीच्या मृत्यूनंतर राजेंद्र आचार्य यांचेही निधन ; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

या घटनेत आचार्य कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला होता.
Baramati Accident Update
मुलगा आणि दोन नातीच्या मृत्यूनंतर राजेंद्र आचार्य यांचेही निधन ; कुटुंबावर दुःखाचा डोंगर Pudhari
Published on
Updated on

बारामती: मालवाहू डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडिलांसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २७) बारामतीत घडली होती. या घटनेत आचार्य कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला होता.

दरम्यान या घटनेचा धक्का सहन न झाल्याने राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही सोमवारी (दिं. २८) निधन झाले. ते निवृत्त शिक्षक होते. आचार्य कुटुंबीय बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरात वास्तव्यास आहे. (Latest Pune News)

Baramati Accident Update
PMPML CNG Buses: पीएमपीच्या ताफ्यात स्वमालकीच्या 200 नव्या सीएनजी बस येणार

रविवारी झालेल्या अपघातात ओंकार राजेंद्र आचार्य यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुली मधुरा व सई यांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या घटनेचा धक्का सहन न झाल्याने आणि अपघातात आपला मुलगा आणि दोन्ही नाती गमावल्याने बसलेल्या धक्क्यामुळे राजेंद्र आचार्य यांचेही निधन झाले. यामुळे आचार्य कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news