Pune News : पुणे ग्रामीण पोलिसांकडून तगडा बंदोबस्त

Pune News : पुणे ग्रामीण पोलिसांकडून तगडा बंदोबस्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून, जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक पोलिस तैनात राहणार आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्हींचा वॉच राहणार असून, संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त फौजफाटादेखील असणार आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागात सार्वजनिक गणपती मंडळांसह घरगुती, एक गाव एक गणपती असे मंडळे असून, उद्या (दि.२८) विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. जिल्ह्यात २ हजार ८७२ सार्वजनिक गणेश मंडळे, २०४ एक गाव एक गणपती, तर ६४ हजार ५२४ घरगुती गणपती विसर्जन होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विसर्जन शांततेत पार पडण्याकरिता गणेश मंडळांसह ढोल-ताशा पथके, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, पोलिस मित्रांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीच ईद ए मिलाद हा सण आल्याने जिल्हा प्रशासनाने बैठका घेऊन ईद मिलादच्या मिरवणुका अनंत चतुर्थीच्या दुसर्‍या दिवशी घेण्यास मुस्लिम बांधवांनी मान्य केले आहे. जिल्ह्यातील प्रमुख विसर्जन मार्गावर व विसर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, या माध्यमातून संबंधित ठिकाणी करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

असा आहे जिल्ह्यातील बंदोबस्त

पोलिस अधीक्षक – १, अप्पर पोलिस अधीक्षक – २, पोलिस उप अधीक्षक – ११, पीआय ते पीएसआय – २२०, पोलिस अंमलदार – १ हजार ६३६, होमगार्ड – ५००, एसआरपीएफ – १ कंपनीआर. पीसी – ४क्यू.आर.टी – २.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news