

पुणे: जिल्ह्यातील बहुतांश भागात गुरुवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली जिल्ह्यातील मावळ भोर माळी पुणे शहरात अति मुसळधार पाऊस झाला मावळ तालुक्यातील कुरवंडे गावात 219 मिलिमीटर पावसाची नोंद सकाळी नऊ वाजेपर्यंत झाली होती पहाटे सहा ते सकाळी नऊ पर्यंत धो धो पाऊस बरसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पुरासारखे पाणी वाहत आहे. शेतात पाणीच पाणी झाले आहे. पुणे शहरातील नागरिकांची पहाटेपासूनच दाणादाण उडाली. शाळेत निघालेल्या मुलांना सोडताना कसरत करावी लागली. मुलांसह पालकांना पहाटेच रेनकोट घालून रस्त्यावरचा चिखल तुडवत कसेबसे शाळेत पोहोचता आले. सर्वत्र चिखल, गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढणे कठीण झाले होते. (Latest Pune News)
अतिमूलसळधार पावसाचे गुरुवारी पहाटे पासून जनजीवन विस्कळीत झाले. घाटमाथ्याला आगामी 48 तास ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यामुळे आणखी दोन दिवस हा पाऊस शहरात बसणार आहे.
गुरुवारी पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यन्त चा पाऊस..
कुरवंडे 219 मिलिमीटर
गिरीवन 160 मिलिमीटर
निमगिरी 116 मिलिमीटर
भोर 109 मिलिमीटर
माळीण 70 मिलिमीटर
तळेगाव 65.5 मिलिमीटर
लावळे 64.4 मिलिमीटर
चिंचवड 60.5 मिलिमीटर
एनडीए 52.5 मिलिमीटर
नारायणगाव 48.5 मिलिमीटर
डुडुळगाव 34.5 मिलिमीटर
पाषाण 33 मिलिमीटर
शिवाजीनगर 315 मिलिमीटर
राजगुरुनगर 26.5 मिलिमीटर
तळेगाव ढमढेरे 21 मिलिमीटर
हडपसर 21.0 मिलिमीटर
मगरपट्टा 19.0 मिलिमीटर
हवेली 17.5 मिलिमीटर
दापोडी 10.5 मिलिमीटर
पुरंदर 5 मिलिमीटर
बारामती 2 मिलिमीटर
दौंड 1.5 मिलिमीटर
घाट माथ्यावरचा गेल्या २४ तासांतील पाऊस (मिमीमध्ये):(आज सकाळी 9 पर्यन्त)
डोंगरवाडी – 223
दावडी – 210
मुळशी (कॅम्प) – 121
मुळशी (बंगला) – 117
आंबोली – 218
पोपाळी – 72
तामिणी – 230
खोपोली – 185
कुंदळी – 147
भीवपुरी – 220
खांड – 189
निळशी – 172 ठाकूरवाडी – 42
भीरा – 154
लोणावळा कार्यालय – 133
शिरगाव – 205
कोयना (नवजा) – 94
धारावी – 70
शिरवटा – 35
वळवण – 122
लोणावळा – 187