

पुणे: श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानाच्या वेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.
श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या अनुषंगाने वाहतुकीत बदल पालखी सोमवारी (दि.23 जून) लोणी काळभोर ते यवतदरम्यान यवतमध्ये मुक्कामी असणार असून, दरम्यान 23 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक वाघोली-केसनंद-राहू-पारगाव-चौफुला तसेच सोलापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-राहू-केसनंद-वाघोली या मार्गे वळविण्यात येणार आहे. (Latest Pune News)
24 जून रोजी यवत ते वरवंडदरम्यान वरवंडमध्ये मुक्कामी असणार दरम्यान 24 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक थेऊर फाटा-केसनंद-राहू-पारगाव- न्हावरे-काष्टी-दौंड-कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुरकुंभ-दौंड- काष्टी-न्हावरे-पारगाव-राहू-वाघोली-पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.
25 जून रोजी वरवंड ते उंडवडी (ता. बारामती) दरम्यान उंडवडीमध्ये मुक्कामी असणार आहे. या वेळी 25 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक चौफुला-पारगाव-न्हावरे-काष्टी-दौंड- कुरकुंभ तसेच सोलापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक कुंरकुंभ-दौंड-काष्टी-न्हावरे- पारगाव-चौफुला- पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.
तसेच, पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून येताना भिगवणमार्गे सोलापूर- पुणे महामार्गावर येतील. बारामतीहून पाटसकडे जाणारी वाहतूक बारामती- लोणीपाटी- सुपा-चौफुला-पाटस तसेच तसेच पाटसहून बारामतीकडे जाणारी वाहने पाटस-चौफुला-सुपा-लोणीपाटी-बारामतीकडे येतील.
26 जून रोजी उंडवडी ते बारामतीदरम्यान बारामती शहरात मुक्कामी असणार असून दरम्यान 26 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड रस्ता बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक भिगवणमार्गे बारामती आणि बारामतीकडून भिगवणमार्गे सोलापूर- पुणे महामार्गावर येतील.
27 जून रोजी पालखी सणसरमध्ये मुक्कामी असणार असून दरम्यान 27 जून रोजी सकाळी 2 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात येणार असून वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतूक जंक्शनमधून कळसमार्गे बारामती अष्टीकडे तसेच बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण कळसमार्गे जंक्शनकडे वळविण्यात येणार आहे.
28 जून रोजी सणसर ते अंथुर्णेदरम्यान निमगाव केतकीत मुक्कामी असणार असून 28 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून ते 29 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती-कळंब-बावडा-इंदापूर, बारामती- भिगवण-इंदापूर तसेच इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक इंदापूर- बावडा- कळंब-बारामती आणि इंदापूर-भिगवण- बारामती यामार्गे वळविण्यात येणार आहे.
29 जून रोजी निमगाव केतकी ते इंदापूरदरम्यान इंदापूरमध्ये मुक्कामी असून पहाटे 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस- जंक्शनमार्गे बारामती किंवा लोणी- देवकर- भिगवणमार्गे बारामतीकडे यामार्गे वळविण्यात येणार आहे.
30 जून रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक अकलूज- बावडा- नातेपुते बारामती तसेच अकलूजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. 30 जून रोजी इंदापूर शहरातील जुना पुणे- सोलापूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बाह्यमार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे.
1 जुलै रोजी इंदापूर ते सराटीदरम्यान सराटीत मुक्कामी असून, पहाटे 2 वाजल्यापासून रात्री 12.00 वाजेपर्यंत तसेच 3 जुलै रोजी पहाटे 2 वा पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत इंदापूर अकलूज रोडवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
इंदापूर ते अकलूज या मार्गावरील वाहने इंदापूर-हिंगणगाव- टेंभुर्णी- गणेशगाव- माळीनगर- अकलूज आणि अकलूज ते इंदापूर मार्गावरील वाहतूक अकलूज-नातेपुते-वालचंदनगर- जंक्शन-भिगवण यामार्गे वळविण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील बदल असा असणार
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (दि.22 जून 2025) पुणे ते सासवडदरम्यान सासवडमध्ये मुक्कामी असणार आहे. या वेळी पहाटे 2 वा. पासून ते 24 जून 2025 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ही वाहतूक खडी मशीन चौक- कात्रज-कापूरव्होळमार्गे तसेच सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे- खेड शिवापूरमार्गे वळविण्यात येणार आहे.
24 ते 25 जून 2025 रोजी सासवड- जेजुरी ते वाल्हेदरम्यान जेजुरी आणि वाल्हेमध्ये मुक्कामी असणार आहे. 24 जून रोजी पहाटे 2 वा. पासून ते 25 जून रोजी रात्री 12 वाजेदरम्यान पुणे येथून सासवड-जेजुरी- वाल्हे-निराकडे तसेच निराकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे- सुपे-मोरगाव-निरामार्गे वळविण्यात येणार आहे.
26 जून 2025 रोजी लोणंदमध्ये मुक्कामी असणार असून, दरम्यान 26 जून रोजी सकाळी 2 वा. पासून ते 26 जून रोजीचे सायं. 5 वा.पर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-निराकडे तसेच निराकडून पुण्याकडे जाणारी जाणारी वाहतूक सासवड- जेजुरी-मोरगावमार्गे वळविण्यात येणार आहे.
26 जून ते 28 जून या कालावधीत लोणंदमधून फलटणकडे पालखी प्रस्थान करणार असून या कालावधीत फलटण लोणंदमधून पुण्याकडे जाणारी तसेच पुण्याहून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतूक शिरवळमार्गे वळविण्यात येणार आहे.