कोकणात पाच दिवस मुसळधारेचा इशारा

कोकणात पाच दिवस मुसळधारेचा इशारा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकणात पाऊस वाढला असून आगामी पाच दिवस त्या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रात आगामी दोन दिवस मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पाकिस्तानमध्ये पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला असून त्याचा प्रभाव उत्तर भारतावर सुरू झाला आहे. हिमालयापासून ते दिल्लीपर्यंत हा प्रभाव राहणार आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पूर्व व पश्चिम मध्य प्रदेशात पाऊस वाढला आहे.

शनिवारी अचानक गुजरात राज्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील कमी झालेल्या पावसात पुन्हा दोन दिवसांची वाढ झाली आहे. कोकणात 10 ऑगस्ट, तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर 8 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस राहणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस या कालावधीत राहील. विदर्भातही 7 ऑगस्टपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात मात्र काही भागांत हलका पाऊस राहील.

असे आहेत अलर्ट…

कोकण ः मुसळधार पाऊस (10 ऑगस्टपर्यंत), मध्य महाराष्ट्र : मध्यम पाऊस (8 पर्यंत), विदर्भ : मध्यम पाऊस (7 पर्यंत), मराठवाडा : हलका पाऊस (7 ऑगस्टपर्यंत).

24 तासांत राज्यातला पाऊस

कोकण : माथेरान 57, मंडणगड 26, जव्हार, लांजा 25 प्रत्येकी, कणकवली, वाकवली (कृषी) 24 प्रत्येकी, अंबरनाथ 20, पोलादपूर, रोहा, वाडा 19, संगमेश्वर, देवरुख, वैभववाडी 18, पालघर (कृषी) 16, शहापूर, दापोली (कृषी) 15 प्रत्येकी, कुडाळ, खालापूर, गुहागर 14 प्रत्येकी, मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 35, लोणावळा (कृषी) 25; मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर 0.2, बीड 0.1; विदर्भ : गोंदिया 22, घाटमाथा : कोयना (नवजा) 116, दावडी 68, अम्बोने 67, डुंगरवाडी 50, ताम्हिणी 35.5.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news