Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात 13 जुलैपर्यंत मुसळधार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पुढील तीन ते चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे.
Monsoon Update
कोकण, मध्य महाराष्ट्रात 13 जुलैपर्यंत मुसळधारPudhari
Published on
Updated on

Rainfall Warning Maharashtra

पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्रात रविवार (दि. 13 जुलै) पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भात मात्र उद्या बुधवार (दि. 9 जुलै) नंतर जोर कमी होणार आहे. दरम्यान, 7 जुलै रोजी विदर्भाला अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी कोकणसह घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पुढील तीन ते चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मध्य आणि पूर्व भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यात होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात 13 जुलै तर विदर्भ, मराठवाड्यात 9 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 10 जुलैपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील पाऊस कमी होत आहे. (Latest Pune News)

Monsoon Update
Sinhagad Monsoon Tourism: सिंहगडावर हजारो पर्यटक; रिमझिम पाऊस अन् दाट धुक्यात वर्षाविहाराचा लुटला आनंद

सोमवारी राज्यात झालेला पाऊस

कोकण: विक्रमगड 113, जव्हार 120, वाडा 95, मुरबाड 90, माथेरान 87, पालघर 72, भिवंडी 68, सावंतवाडी 60, वसई 59, अंबरनाथ 51, कल्याण 51, कर्जत 50, उल्हासनगर 50, ठाणे 44, डहाणू 41, माणगाव 38, महाड 36, फोंडा 35, मंडणगड 35, केपे 35, पाली 33.

मध्य महाराष्ट्र: इगतपुरी 173, र्त्यंबकेश्वर 127, लोणावळा 107, राधानगरी 89, ओझरखेडा 83, महाबळेश्वर, पेठ 69, दिंडोरी 59, हर्सूल 52, नाशिक, पौड 51, वेल्हे 51, सुरगणा 50, साक्री 45, आजरा 45, नवापूर 45, अकोले, भोर 33, वणी 33, जामनेर 31, शाहूवाडी 31.

मराठवाडा: सोयगाव 36, तोंडापूर 21, सेनगाव, हिमायतनगर 18, हदगाव 17.

विदर्भ: गोंदिया 86, वरोरा 73, तुमसर 63,1, मेहकर, सालेकसा 47, एटापल्ली 46, देवरी, वणी 45, भंडारा, गडचिरोली, मूल 38, रामटेक 37.

घाटमाथा: शिरगाव 122, कोयना 115, अंबोणेे 115, लोणावळा 96, ताम्हिणी 90, लोणावळा 88,वळवण 83, दावडी 79, भिवपुरी 69, खंद 63, वाणगाव 62, खोपोली 57,भिरा 53, ठाकूरवाडी 51.

Monsoon Update
Bhama Askhed Dam Water Level: भामा आसखेड धरणात 54 टक्के पाणीसाठा

कोकण, मध्य महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा अंदाज

सोमवारी कोकणात सरासरी 80 ते 100, तर घाटमाथ्यावर सरासरी 100 मि.मी. पाऊस झाला. पुढील सात दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, 8 व 9 जुलै राज्यातील बहुतांश भागांत मोठ्या पावसाचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news