Heatwave In Indapur: उष्णतेचा कहर! इंदापूर तालुक्यात शेतकरी, मजूर आणि नागरिक हैराण

४२ अंशांच्या पुढे तापमान; ऊस उत्पादन आणि दूध व्यवसायावरही परिणाम
Heatwave
HeatwavePudhari
Published on
Updated on

बावडा: इंदापूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून वाढत्या उष्णतेचा व तीव उकाड्याचा प्रकोप कायम असल्याचे चित्र मंगळवारी (दि. 19) दिसून आले. सध्याच्या वाढत्या उष्णतेने शेतकरी, शेतमजूर व समाजातील सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. दिवसा अंगाची लाहीलाही होत असल्याने दुपारच्या सुमारास रस्ते देखील ओस पडू लागले आहेत.

Heatwave
Rajgurunagar Retwadi Attack: राजगुरुनगरमध्ये मुरूम उत्खननाच्या वादातून रक्तरंजित हल्ला

चालू वर्षी अचानकपणे वाढलेली तीव स्वरूपाची उष्णता व वाढलेल्या आद्रतेने उकाड्याची असह्य तीवता दिसून येत आहे. तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा पारा ओलांडल्याने ज्येष्ठ नागरिक व बालकांना तीव उष्णतेचा सामना करावा लागत आहे. दुपारी रस्त्यांवर गर्दी तुरळक दिसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारी बाजारपेठा ओस पडत आहेत, तर दुपारी शेतमजूर शेतात काम करणे बंद करून विश्रांती घेताना दिसत आहेत.

Heatwave
Illegal Fetal Determination Racket: केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरण; व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांची कारवाई

वाढत्या उष्णतेने ऊस पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाल्याची माहिती अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश मेहेर (सुरवड) यांनी दिली. त्याचा परिणाम उसाच्या टनेजमध्ये होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Heatwave
Maharashtra Diesel Price Hike: डिझेल दरवाढीचा मंचरमध्ये मोठा फटका; शेतकरी आणि वाहतूक व्यवसायिक चिंतेत

वाढत्या उष्णतेने जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण दिसून येत आहे, असे निरा भीमा कारखान्याचे संचालक राजकुमार जाधव (सराफवाडी) यांनी सांगितले.

Heatwave
PMRDA Road Quality Issue: भामा आसखेड परिसरात 5 कोटींच्या रस्त्याच्या कामावर निकृष्ट दर्जाचा आरोप

सध्याच्या वाढत्या उष्णतेने तरुण नागरिक व वृद्धांमध्ये बालकांच्या तुलनेत जास्त अशक्तपणा येणे, चिडचिड करणे व उष्माघाताची लक्षणे वाढत्या उन्हामुळे दिसत आहेत. सध्याच्या वाढत्या तीव उन्हामुळे नागरिक व बालकांनी दुपारी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. सायंकाळी घराबाहेर पडावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news