Illegal Fetal Determination Racket: केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरण; व्हायरल व्हिडीओनंतर पोलिसांची कारवाई

दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरण उघडकीस आले
Fetal Determination
Fetal DeterminationPudhari
Published on
Updated on

केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान चाचणी प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित व्हिडीओ क्लिपमुळे आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेबाबत गेले काही दिवस दै. ‌‘पुढारी‌’ने आवाज उठवत पाठपुरावा केला होता. पोलिसांनी याची दखल घेत मोठी कारवाई केली.

Fetal Determination
Maharashtra Diesel Price Hike: डिझेल दरवाढीचा मंचरमध्ये मोठा फटका; शेतकरी आणि वाहतूक व्यवसायिक चिंतेत

याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केडगाव परिसरात गर्भलिंगनिदान चाचणीसंदर्भातील काही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. या व्हिडीओंची गंभीर दखल घेत दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांनी यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Fetal Determination
PMRDA Road Quality Issue: भामा आसखेड परिसरात 5 कोटींच्या रस्त्याच्या कामावर निकृष्ट दर्जाचा आरोप

या तक्रारीच्या आधारे अण्णासाहेब गिरी याच्याविरोधात गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संशयिताला ताब्यात घेत अटक केली. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून, बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या रॅकेटबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Fetal Determination
Baner Pashan Sus Skywalk Demand: बाणेर–पाषाण–सूस उड्डाणपुलावर पादचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास; स्कायवॉकची मागणी तीव्र

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून केडगाव आणि परिसरात गर्भलिंगनिदान चाचणीसंदर्भातील चर्चांना उधाण आले होते. काही ठिकाणी गुप्तपणे चाचण्या सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत होत्या. आता व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड करीत आहेत.

Fetal Determination
Pune Gang War: पुण्यात टोळीयुद्धाचा स्फोट; आंदेकर-गायकवाड गटात पुन्हा रक्तरंजित संघर्ष

संशयितांमध्ये खळबळ

आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित व्हिडीओंची तांत्रिक पडताळणी, त्यामागील नेटवर्क, संबंधित व्यक्ती आणि संभाव्य आर्थिक व्यवहार, यांचा तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या कारवाईमुळे परिसरात कार्यरत असलेल्या इतर संशयितांमध्येही खळबळ उडल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news