डेंग्यू निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचे नागरिकांना ‘हे’ आवाहन..!

डेंग्यू निर्मूलनासाठी आरोग्य विभागाचे नागरिकांना ‘हे’ आवाहन..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करावे, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निर्माण होऊ देऊ नये, यासाठी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्या निमित्ताने केले आहे. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवणुकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करून भरावे. एक दिवस कोरडा पाळण्यात यावा.

अशा कराव्यात उपाययोजना डेंग्यू डासांची उत्पत्ती साठविलेल्या  पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्यरीतीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने हिवताप, डेंग्यूचे प्रमाण कमी होईल. यासाठी घराजवळ असलेले नाले वाहते करून डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत. तसेच, नष्ट करता न येणार्‍या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडावेत. पाण्याच्या साठ्यांना घट्ट झाकण बसवावे. डबकी बुजवावीत, अंगभर कपडे घालावेत.

डेंग्यू हा आजार नागरिकांच्या सहकार्याशिवाय रोखता येणे शक्य नसल्याने यामध्ये नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक असून, डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांनी
सहकार्य करावे.

– डॉ. राधाकिशन पवार, सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news