

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यापूर्वीही बालकांची आरोग्य तपासणी करून बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा जिल्ह्यात बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, तर एका खासगी संस्थेचा टेक्निकल सपोर्ट मिळाल्यानंतर चाईल्ड हेल्थ ट्रॅकिंग सिस्टिममध्ये अपडेट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
तपासणीत आढळून आलेल्या दुर्धर आजारांवरील बालकांवर मोफत शस्त्रक्रिया जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ही तपासणी करण्यात येणार असून, आरोग्य विभाग त्यांना मदत करणार आहे. तसेच खासगी संस्थेची टेक्निकल साह्य घेऊन समन्वयाने ही मोहीम राबविली जाणार आहे.
बाल आरोग्य ट्रॅकिंग प्रणालीअंतर्गत शून्य ते 6 वर्षे वयोगटातील सर्व बालकांची ही आरोग्य तपासणी होणार आहे. दरम्यान, सर्व बालकांची आरोग्य तपासणी करून चाईल्ड हेल्थ ट्रॅकिंग सिस्टिममध्ये प्रत्येक बालकाची आरोग्य स्थिती व अचूक माहिती नोंदविण्यात येणार आहे.
हेही वाचा