Haveli Duplicate Voters Issue: हवेली तालुक्यात 3,064 दुबार मतदार; निवडणूक यंत्रणा अलर्ट

दुबार मतदान फौजदारी गुन्हा; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीपूर्वी प्रशासनाचा कडक इशारा
Vote
VotePudhari
Published on
Updated on

खडकवासला: हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर दुबार मतदारांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. तालुक्यात तब्बल 3 हजार 64 दुबार मतदार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा अलर्ट झाली आहे.

Vote
Weather Impact On Farmers: बदलत्या हवामानाचा शेतीवर घाला; द्राक्ष, कांदा, मुळा, ज्वारी उत्पादक अडचणीत

या दुबार मतदारांत 1 हजार 734 पुरुष, तर 1 हजार 330 महिला मतदारांचा समावेश आहे. दोन ठिकाणी मतदान करणे हा केवळ गैरप्रकार नसून तो गंभीर फौजदारी गुन्हा असल्याचे स्पष्ट करत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी अशा मतदारांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत मतदान केलेल्या काही मतदारांची नावे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या यादीतही असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकाच व्यक्तीने दोन्ही ठिकाणी मतदान केल्यास लोकशाहीच्या नियमांचे उल्लंघन होते. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, तालुक्यातील 263 मतदान केंद्रांवर विशेष देखरेख ठेवली जाणार आहे.

Vote
Pune Drunk Driving Action: दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची ‘शाळा’; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सज्जड इशारा

दुबार नावे असलेल्या मतदारांना प्रशासनाने एक संधी दिली आहे. संबंधित मतदारांनी आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे संपर्क साधावा. परिशिष्ट-1 मध्ये लेखी माहिती देऊन आपण नेमके कोणत्या केंद्रावर मतदान करणार आहोत, हे स्पष्ट करावे लागणार आहे.

दरम्यान, हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे बोगस मतदानाला चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vote
Maharashtra Railway Budget: महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांसाठी 23,926 कोटींची तरतूद

कायदा काय सांगतो

डॉ. माने यांनी कायद्याचा दाखला देत स्पष्ट केले की, दुबार मतदान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950: कलम 17 व 18, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 : कलम 62 (3) व (4) या कलमान्वये दोषी आढळल्यास संबंधित मतदारावर फौजदारी खटला भरला जाऊ शकतो.

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 1 लाख 48 हजार 518 महिला, तर 1 लाख 53 हजार 425 पुरुष व 13 इतर असे एकूण 3 लाख 1 हजार 956 मतदार आहेत. पाबळ जिल्हा परिषद गटात सर्वाधिक 46 हजार 620, तर पंचायत समितीच्या केंदूर गणात सर्वाधिक 23,330 मतदार आहेत. जिल्हा परिषदेसाठी 7 फेबुवारी रोजी मतदान होणार आहे. 9 फेबुवारी रोजी कारेगाव येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.

Vote
Samarth Bharat Initiative: समाजाकडे विश्वासाने पाहण्याची गरज; समर्थ भारत ही संधी व आव्हान– डॉ. मोहन भागवत

जिल्हा परिषदेच्या 7 गटांतील मतदारसंख्या पुढीलप्रमाणे - कवठे यमाई - 42,690, न्हावरा - 43,241, रांजणगाव गणपती - 41,121, पाबळ - 46,620, शिक्रापूर - 40, 747, तळेगाव ढमढेरे - 43,677, मांडवगण फराटा - 43, 690.

पंचायत समिती गणनिहाय मतदार पुढीलप्रमाणे - टाकळी हाजी - 20,728, कवठे यमाई - 21,962, शिरूर ग््राामीण - 22,765, न्हावरा - 20,476, रांजणगाव गणपती - 20,732, कारेगाव - 20,389, पाबळ - 23,290, केंदूर - 23,330, शिक्रापूर - 21,159, सणसवाडी - 19,588,तळेगाव ढमढेरे - 23,081, रांजणगाव सांडस - 20,596, वडगाव रासाई - 22,254, मांडवगण फराटा - 21.

मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाहीचा आदर राखून दुबार मतदारांनी स्वतःहून आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा कायद्याच्या कचाट्यातून सुटका होणार नाही

डॉ. यशवंत माने, निवडणूक निर्णय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news