Indapur Highway Accident: लोणी देवकर येथे भीषण अपघात; टायर फुटून क्रूझरची ट्रकला धडक, तिघांचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर सकाळी दुर्घटना; एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
Indapur Highway Accident
Indapur Highway AccidentPudhari
Published on
Updated on

इंदापूर: पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर परिसरात एका क्रूजर जीपचा टायर फुटून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये क्रूजर गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये मृत पावलेले तीनही लोक लोणी देवकर एमआयडीसी मधील खासगी कंपनीतील कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे.

Indapur Highway Accident
India Sugar Export Quota: साखर निर्यात कोट्यावर जाचक अटी; राज्यातील कारखानदार नाराज

घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एम.एच.१३ एल.बी .१६१३ क्रमांकाच्या क्रूजर गाडी मधून हे तीनही कर्मचारी प्रवास करत होते.यावेळी अचानक गाडीचा टायर फुटला आणि रस्ता दुभाजक ओलांडून ही गाडी समोरून येणाऱ्या एम. एच.१२ वाय क्यू.६६०३ क्रमांकाच्या ट्रकला धडकली गेली या गंभीर अपघातात क्रूजरमधील चालकासह तिघेजण जागीच मृत्यू पावले आहेत.

Indapur Highway Accident
Maharashtra Stamp Duty Refund: मुद्रांक शुल्क परतावा जलद; 20 लाखांपर्यंतची प्रकरणे जिल्हा स्तरावरच निकाली

या अपघातात वाहन चालक प्रमोद बाळासो खवळे( वय २८ रा. मदनवाडी ता. इंदापूर शशांक कोटिया (वय ३२रा.गौतमनगर, गिरड ग्वालियर मध्य प्रदेश , विजयसिंह राजपूत (वय ३५ वर्षे)त्रीलोकनगर मध्यप्रदेश यांचा जागीच मृत्यू झाला.

Indapur Highway Accident
Pune Property Tax Abhay Yojana: अभय योजनेला थंड प्रतिसाद; 1070 कोटींची वसुली, तरीही थकबाकीदारांकडून पाठ फिरवली

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात मंगळवारी(दि. १७) रोजी सकाळी९ ते सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.हा अपघात इतका भीषण होता की क्रूझर जीप च्या समोरील भागाचा अक्षरशा या अपघातात चुराडा झाला.

Indapur Highway Accident
MahaVitaran Electricity Meter Issue: महावितरणकडून 100 वर्षांच्या आजीबाईचा वीजमीटर काढला, घर उकाड्यात अंधारात

घटनेची माहिती मिळताच इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर,सहा.फौजदार बालगुडे,सहा.फौजदार जगदाळे,पो.हवा. पाटील,पो.हवा.वागजकर,पो.हवा.पवार, पो.हवा.मारकड,पो. हवा.हंडाळ,पो.कॉ.झगडे व कळसाईत अपघात स्थळी दाखल झाले. अपघात ग्रस्त वाहने बाजूला करत त्यांनी वाहतुकीसाठी मार्ग खुडा करून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news