Pune Narcotics Case: अल्पवयीन मुलामार्फत गांजाची विक्री; हडपसरमध्ये २१ किलो गांजा जप्त

गुन्हे शाखेची कारवाई; ११ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
Pune Crime Branch
Pune Crime BranchPudhari
Published on
Updated on

पुणे: अल्पवयीन मुलाचा वापर करून गांजाची विक्री केल्याचा प्रकार हडपसरमधील सुरक्षानगर परिसरात उघडकीस आला. पोलिसांनी गांजा, मोपेड, मोबाईल आणि इतर साहित्य असा ११ लाख ४४ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुन्‍हे शाखेच्‍या युनिट ६ ने केली.

Pune Crime Branch
Pune No Parking: पुण्यात अनेक रस्त्यांवर ‘नो पार्किंग’; वाहतूक पोलिसांचे नवे आदेश

याप्रकरणी पोपट मारुती पाडुळे (वय ५६, रा. नवीन म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर) असे अटक करण्यात आलेल्‍याचे नाव आहे, तर विधिसंघर्षित बालकासह आणखी एकावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या पोलिस हवालदार पल्लवी सागर मोरे यांनी फिर्याद दिली आहे.

Pune Crime Branch
Pune Waste Management: पुण्यात टेक्स्टाइल-फर्निचर कचऱ्यावर होणार प्रक्रिया; रामटेकडीत ७५ टन क्षमतेचा प्रकल्प

युनिट ६चे पथक सुरक्षानगर परिसरात गस्‍त घालत असताना पोलिस हवालदार पल्‍लवी मोरे आणि अंमलदार बाळासाहेब सकटे यांना रविवारी (दि. ३० ऑगस्ट) एक व्यक्‍ती नवीन म्हाडा कॉलनीतील इमारत क्रमांक अकरासमोरील मोकळ्या जागेत मोपेड गाडीवर थांबला असून, त्‍यांच्‍याकडे गांजा आहे, अशी खबर मिळाली.

Pune Crime Branch
Sugar Prices Fall: साखरेचे दर पुन्हा घसरले; क्विंटलला ५०० रुपयांची कपात

त्‍यानुसार त्‍याला ताब्यात घेतले. त्‍यानंतर गांजा पुरविणाऱ्या पोपट पाडुळे याला अटक केली. त्‍याच्‍याकडून २१ किलो १८० ग्रॅम गांजासह ११ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.

Pune Crime Branch
E Praman Portal Banks: आता बँकांनाही ‘ई प्रमाण’चा आधार; घरकर्जासाठी दस्ताची सत्यता क्षणात पडताळता येणार

ही कारवाई पोलिस उपायुक्‍त गौहर हसन यांच्‍या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संतोष शेटे, सहायक निरीक्षक संतोष कदम, उपनिरीक्षक आशिष जाधव, सहायक पोलिस फौजदार ज्ञानेश्र्वर शिर्के, अंमलदार तानाजी देशमुख, समीर पांडुळे, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, अमित सस्‍ते, प्रशांत कर्णवर, पल्‍लवी मोरे, मनीषा लोखंडे यांच्‍या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news