GST Input Credit Misuse: इनपुट क्रेडिट गैरव्यवहार रोखण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढे यावे : जीएसटी प्रधान आयुक्त

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत जीएसटी सुधारणा, ITC पारदर्शकता आणि नव्या नियमांची सविस्तर चर्चा
GST Input Credit Misuse
GST Input Credit MisusePudhari
Published on
Updated on

पुणे : जीएसटी करसंकलन वाढत आहे, ही बाब चांगली आहे. मात्र, यातही इनपुट क्रेडिट टॅक्स प्रकारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहेत, ते रोखले पाहिजेत असे आवाहन जीएसटीच्या पुणे विभागाचे प्रधान आयुक्त मयंक कुमार यांनी केले.

GST Input Credit Misuse
Winter Temperature Drop Pune: राज्याला हुडहुडी! पुण्यात पाषाणमध्ये पारा ८.४ अंशांवर

वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीत सनदी लेखापालांची भूमिका महत्त्वा‍ची राहिली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी 'जीएसटी' कायद्यात बदल केले जात आहेत.

GST Input Credit Misuse
NMMS Exam Hall Ticket: एनएमएमएस परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध; राज्यात २८ डिसेंबरला परीक्षा; पहा असे डाउनलोड करता येईल हॉलतिकिट

सनदी लेखापालांना हे नवे बदल समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदा उपयुक्त ठरतात, असे मत केंद्रीय जीएसटी तथा कस्टम विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त मयंक कुमार यांनी व्यक्त केले.

GST Input Credit Misuse
Maharashtra Drama Competition Pune: राज्य नाट्य स्पर्धा: पुणे प्राथमिक फेरीत ‘कर्ण’ नाटकाला मानाचा पहिला क्रमांक

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) जीएसटी अँड इन्डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने आणि आयसीएआय पुणे शाखेच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मंगळवारी मयंक कुमार यांच्या हस्ते झाले.

GST Input Credit Misuse
Pune Pub Fire Safety: नववर्षाआधी पुण्यातील पब-बारसाठी अग्निशमन दलाचे तातडीचे आदेश

म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट्स येथे झालेल्या या कार्यक्रमात जीएसटी कमिटीचे उपाध्यक्ष उमेश शर्मा, केंद्रीय समिती सदस्य चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य रेखा धामणकर, अभिषेक धामणे, राजेश अग्रवाल, पुणे शाखेचे अध्यक्ष सचिन मिणियार, उपाध्यक्ष प्रणव आपटे, उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news