Pune Statue : एनडीएमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा, तब्बल चार हजार किलो ब्राँन्झचा वापर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार पुतळ्याचे अनावरण
Pune Statue
एनडीएमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा
Published on
Updated on

पुणे : अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवारी 4 जुलैला आयोजित करण्यात आला असून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचा अनावरण सभारंभ 4 जुलैला सकाळी १०.४५ वाजता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, एनडीएचे कमांडंट डमिरल गुरचरण सिंह यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी (दि.१) प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली.

Pune Statue
Pune Potholes: खड्डे मोडताहेत पुणेकरांचे कंबरडे; रस्त्यांची लागली 'वाट'

१३.५ फूट उंच, चार हजार किलो ब्राँन्झ...

बाजीराव पेशवे यांच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्यात, या भावनेने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले असून कुंदनकुमार साठे सचिव आहेत. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्यावतीने साडेतेरा फुट उंचीचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला आहे. चार हजार किलो ब्राँझचा वापर करून विपुल खटावकर यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे.

श्रीमंत बाजीराव पेशवे यांना दीर्घ आयुष्य लाभले नाही. ४० वर्षांच्या आयुष्यात श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी लढलेल्या प्रत्येक युद्धात विजय मिळविला होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य पुतळ्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थींना अजेय योद्धा पेशवे यांचा भव्य पुतळा कायम प्रेरणादायी ठरेल, अशी भावना थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे यांनी व्यक्त केली.

Pune Statue
Pune News: सर्व्हर डाऊन झाल्याने मिकळत कर भरण्यास अडचणी; 7 जुलैपर्यंत मुदतवाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news