Gram Panchayat Corruption: ग्रामपंचायत; विकासाचे केंद्र की कमिशनचे?

निधी आहे; पण रस्ते, पाणी, स्वच्छता अजूनही प्रश्नातच
Gram Panchayat
Gram PanchayatPudhari
Published on
Updated on

रामदास डोंबे

खोर: गावाच्या विकासाची पहिली पायरी म्हणून ओळखली जाणारी ग््राामपंचायत आज अनेक ठिकाणी प्रश्नांच्या गर्तेत सापडली आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती, घरकुल अशा मूलभूत गरजांसाठी असलेली ही यंत्रणा आता कामापेक्षा कमिशनसाठीच अधिक ओळखली जाऊ लागली आहे का? असा थेट सवाल सामान्य ग््राामस्थ विचारू लागले आहेत.

Gram Panchayat
Pune Lit Fest History Session: बहुमतापेक्षा सत्य महत्त्वाचे; इतिहास अभ्यास वतस्थपणे हवा: अविनाश धर्माधिकारी

केंद्र व राज्य शासनाकडून 15 वा वित्त आयोग, स्वच्छ भारत अभियान, जलजीवन मिशन, घरकुल योजना यांसारख्या योजनांसाठी लाखो रुपयांचा निधी ग््राामपंचायतींना मिळतो. मात्र, प्रत्यक्षात गावातील रस्ते अजूनही खड्डेमय, पाण्याची समस्या कायम, कचऱ्याचे ढीग आणि निकृष्ट दर्जाची कामे हेच चित्र अनेक गावांत दिसत आहे. मग प्रश्न उभा राहतो हा निधी नेमका जातो कुठे?

Gram Panchayat
Rajgad Bridge Collapse: राजगड पायथ्याजवळ लोखंडी पूल कोसळला; डंपर नदीपात्रात

ग््राामपंचायत स्तरावर विकासकामे मंजूर होताना ठेकेदार, पदाधिकारी आणि काही अधिकारी यांच्यातील ‌’समजूतदारपणा‌’ उघड गुपित बनला आहे. काम मिळवण्यासाठी ठराविक टक्केवारी द्यावी लागते, अशी चर्चा उघडपणे गावात होते. परिणामी कामाच्या दर्जावर परिणाम होतो आणि नुकसान मात्र गावकऱ्यांचेच होते. कायद्याने ग््राामसभा ही सर्वोच्च असली, तरी प्रत्यक्षात ग््राामसभा म्हणजे केवळ औपचारिकता बनली आहे. प्रश्न विचारणाऱ्या ग््राामस्थांकडे दुर्लक्ष, सूचना फाईलमध्येच गाडल्या जाणे आणि ठराव आधीच ठरवून आणले जाणे, ही आजची वस्तुस्थिती आहे. लोकशाहीचा पाया असलेली ग््राामसभा कमकुवत झाली तर गावाचा आवाज कोण ऐकणार?

Gram Panchayat
Pune Cyber Fraud: पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; 13 गुन्ह्यांत 1 कोटी 61 लाखांची फसवणूक

गावविकासासाठी बदल गरजेचा

  • ग््राामपंचायत जर खऱ्या अर्थाने विकासाचे केंद्र बनायचे असेल तर खालील मुद्द्‌‍यांवर भर देणे गरजेचे आहे.

  • ग््राामसभेला खरे अधिकार

  • कामांवर स्वतंत्र व कठोर लेखापरीक्षण

  • दोषींवर कारवाई

  • नागरिकांचा सक्रिय सहभाग

  • पारदर्शक कारभार

Gram Panchayat
Rajgad Fort Honeybee Attack: राजगड किल्ल्यावर मधमाश्यांचा तुफान हल्ला; 35 पर्यटक जखमी

तक्रारदारच आरोपी ठरतोय

कामातील भष्टाचाराबाबत आवाज उठवणारा ग््राामस्थ अनेकदा ‌‘विकासविरोधी‌’ ठरवला जातो. काही ठिकाणी तर सामाजिक बहिष्कार, खोट्या तक्रारी, दबावतंत्र वापरले जाते. त्यामुळे अनेक प्रामाणिक लोक गप्प बसणेच पसंत करत आहेत.

ग्रा.पं.च्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव

ऑनलाइन पोर्टल, ई-टेंडर, डिजिटल ग््राामपंचायत यासारख्या संकल्पना कागदावर चांगल्या वाटतात; पण प्रत्यक्षात माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना अजूनही हेलपाटे मारावे लागतात. खर्चाचे तपशील, अंदाजपत्रक, कामांची मोजणी ही माहिती सर्वसामान्यांसाठी अजूनही सहज उपलब्ध नसून, आजही ग््राामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news