

पुणे: जीवनात एक क्षेत्र निवडून अफाट काम करतात अशी चक्रम माणसे महाराष्ट्राचे वैभव आहेत. इतिहासाचार्य राजवाडे यांची परंपरा मेहेंदळे यांनी अधिक कठोरपणे, वतस्थपणे पुढे चालवली. तरुण पिढीने हा वारसा पुढे नेणे ही खरी श्रद्धांजली ठरेल. बहुमताच्या आकड्यापेक्षा सत्याची ताकद मोठी आहे. त्यासाठी वतस्थ आणि तटस्थपणे अभ्यास व्हायला हवा आहे, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. पुणे पुस्तक महोत्सवातील ‘पुणे लिट फेस्ट’मध्ये इतिहासाचार्य राजवाडे ते गजाननराव मेहेंदळे या विषयावरील सत्रात अविनाश धर्माधिकारी यांनी संवाद साधला.
धर्माधिकारी यांनी त्यांच्या भाषणातून राजवाडे ते मेहेंदळेंपर्यंतची इतिहास लेखनाची परंपरा मांडली. ते म्हणाले, आयुष्य इतिहास या विषयाला वाहायचे ठरवलेल्या राजवाडे यांचे वैयक्तिक आयुष्य विदारक होते. चणेफुटाणे खाऊन राहायचे, पण गावोगावी कागदपत्रे शोधायचे. करारी वतस्थपणा राजवाडे यांच्यात होता. इतिहास शास्त्रशुद्ध असल्याचे शिकवले गेले नाही, बिटिशांनी इतिहास हा विषय वस्तुनिष्ठपणे मांडण्याची पद्धत आणल्याचे सांगितले जाते. मात्र, ‘हे असे घडले’ ही इतिहासाची सर्वोत्तम व्याख्या आहे.
आपल्या देशात जगण्याचा संघर्ष असताना छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती टिकवली. बिटिश अधिकारी ग््राँड डफने ‘हिस्ट्री ऑफ मराठाज’ हा ग््रांथ 1826 मध्ये प्रकाशित केला. इंग््राजांनी भारत मराठ्यांकडून जिंकला हे समजून घेतले पाहिजे. मराठ्यांचा प्रभाव अखिल भारतीय होता. ग््राँड डफच्या लेखनाला तोडीस तोड उत्तर राजवाडे यांनी दिले. एकट्या राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे 22 खंड लिहिले. देशातील भाषा, इतिहास, संस्कृतीला कमी लेखण्याचे काम पद्धतशीरपणे तेव्हाही चालू होते, आजही सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज समजावून घेण्यासाठी गजाननराव मेहेंदळे यांनी लिहिलेले दोन खंड वाचावेत. इतिहास साधनांची अंतर्गत चिकित्सा आणि बाह्य चिकित्सेत मेहेंदळे तज्ज्ञ होते. स्वातंत्र्यानंतर सरकारपुरस्कृत मार्क्सवादी इतिहासकारांनी इतिहासाची मोडतोड केली. मराठ्यांचा इतिहास हा जागतिक दर्जावर पोहचायला हवा आहे. त्यासाठी तो इंग््राजीत करावा लागणार आहे. इतिहास आपली आत्मप्रतिमा घडवत असल्याचे देखील धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले.
आर्थिक उदारीकरण ते हिंदुत्व
संशोधनपर चरित्रलेखन या विषयावरील सत्रात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने यांनी सहभाग घेतला. त्यांच्याशी वसुंधरा काशीकर भागवत यांनी संवाद साधला. यात 1991 ते 2025 या काळातील आर्थिक उदारीकरण ते हिंदूत्वाचा प्रवास उलगडण्यात आला.