धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवू शकत नाही : विजय वडेट्टीवार 

धनगर आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवू शकत नाही : विजय वडेट्टीवार 
Published on
Updated on
बारामती : पुढारी वृत्तसेवा : केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे. सरकारकडे मोठे बहुमत आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची त्यांची नियत असेल तर ते चुटकीसरशी हा प्रश्न सोडवू शकतात. परंतु त्यांची नियत आहे का? हा खरा प्रश्न आहे, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ते हा प्रश्न सोडवत नसतील तर त्यांना राजकारणातून पर्मनंट बाद करण्याचा निर्णय समाजाने घ्यावा, असेही ते म्हणाले.
बारामतीत धनगर आरक्षण प्रश्नी आमरण उपोषणाला बसलेल्या चंद्रकांत वाघमोडे यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.  आपल्या लोकांनीच त्यांना शक्ती दिली. बारामतीत येवून त्यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु काही झाले नाही. महाविकास आघाडी सरकारचा काळ कोरोनात गेला. त्यानंतर स्थिती पूर्वपदावर येत असताना सरकार कोसळले. आता राज्यात व केंद्रात एकाच विचाराचे सरकार आहे. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. विरोध करायला सुद्धा संख्या राहिलेली नाही. त्यांची प्रश्न सोडविण्याची नियत असेल तर तो सुटेल. मी प्रश्न मांडण्याासठी वचनबद्ध आहे, पण तुम्ही सुद्धा सरकारला जाब विचारला पाहिजे असे ते म्हणाले.
वडेट्टीवार पुढे म्हणाले, अनेक वर्षे हा प्रश्न अडकवून ठेवला गेला. ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. ८ डिसेंबरला धनगर समाजाचा नागपूरात मोर्चा आहे. त्याच दिवशी सभागृहात मी हा प्रश्न उपस्थित करणार आहे. सरकारची दुसरी टर्म सुरु झाली तरी आरक्षण दिले गेले नाही. आता तर हा प्रश्न सोडवला नाही तर त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून पर्मनंट बाद करू अशी भूमिका समाजाने घेण्याची आवश्यकता आहे. जो आरक्षणाचा प्रश्न सोडवेल त्याच्याच मागे उभे राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news