

पुणे : गत दहा दिवसांपासून राज्यातील गारठ्यात वाढ होत असून, किमान तापमानाचा पारा ८ ते १२ अंशांवर आला आहे. बहुतांश शहरांचे तापमान महाबळेश्वर पेक्षाही कमी नोंदले जात आहे. मंगळवारी (दि.16) गोंदिया ८.४, अहिल्यानगर ८.४, तर पुणे ९.४ अंशांवर होते.
यंदा सलग दहा दिवसांपेक्षा जास्त काळ राज्यात थंडीची लाट सक्रिय आहे. राज्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून (दि.६ डिसेंबर) थंडीची लाट सक्रिय आहे. यंदाच्या हंगामातील गारठ्याची ही सर्वात दीर्घ लाट ठरली असून १९ डिसेंबरपर्यंत कडाक्याची थंडी राहील, असा अंदाज आहे.
अहिल्यानगर ८.४, पुणे ९.४, जळगाव १०.३, कोल्हापूर १५.१, महाबळेश्वर १२.१, मालेगाव ९.२, नाशिक ८.८, सांगली १४.८, सातारा १३.५, सोलापूर १४.९, छत्रपती संभाजीनगर १०.९, परभणी ११.३, अकोला ११, अमरावती ११.३, बुलढाणा १२.३, ब्रह्मपुरी १२.४, चंद्रपूर १३, गोंदिया ८.४, नागपूर ९.६, वाशीम १०.२, वर्धा १०.८, यवतमाळ १०.