Pune Licensed Street Vendors Eviction: येरवड्यात परवानाधारक पथारी व्यावसायिकांवर मध्यरात्री कारवाई; नोटीस न देता टपऱ्या हटवल्याचा आरोप

१५ वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचा आक्रोश; मूलभूत सुविधांसाठी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
Pune Licensed Street Vendors Eviction
Pune Licensed Street Vendors EvictionPudhari
Published on
Updated on

येरवडा: शहरात गरिबाच्या ताटातील घास हिसकावणारी कारवाई करण्यात आली आहे. शास्त्रीनगर झोन क्र. १६ सह्याद्री हॉस्पिटलसमोर गेल्‍या १५ वर्षांपासून वैध परवान्याने व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत पथारी व्यावसायिकांवर पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मध्यरात्री दहशतीत बुधवारी (दि. ५) रात्री एक वाजता कोणतीही नोटीस न देता वीज तोडून जेसीबीच्या साहाय्याने बंद टपऱ्या फोडण्यात आल्या.

Pune Licensed Street Vendors Eviction
Crop Loan Without CIBIL: शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी सिबिलची अट नाही; आरबीआयच्या सूचनांचे पालन करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश

कारवाईनंतर सर्वांना जबरदस्तीने जीएसटी भवन परिसरात हलविण्यात आले. मात्र, तिथे १०० हून अधिक स्टॉल असूनही एका नळाद्वारेही पाणीपुरवठा नाही, वीजपुरवठा नाही, स्‍वच्‍छतागृह नाही. या संपूर्ण प्रकारामागे उपआयुक्तांचा हात असल्याचा गंभीर आरोप व्यावसायिकांनी केला आहे.

Pune Licensed Street Vendors Eviction
Fine Art Admission 2026: फाईन आर्ट प्रवेशासाठी १,३२४ विद्यार्थ्यांची अर्ज निश्चिती; २९ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार प्रवेश प्रक्रिया

त्यांनी बुधवारी आयुक्तांना निवेदन देत स्वतंत्र चौकशीची मागणी केली. व्यावसायिकांनी सहा मागण्या केल्या आहेत. त्यात बनकर यांच्या भूमिकेची चौकशी, दोन्ही कारवायांची उच्चस्तरीय चौकशी, मूळ जागेवर पुनर्स्थापना किंवा सुविधा असलेली पर्यायी जागा, आणि जीएसटी भवनमध्ये तत्काळ मूलभूत सुविधा देणे यांचा समावेश आहे. प्रशासनाने ४८ तासांत दखल न घेतल्यास महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Pune Licensed Street Vendors Eviction
Swargate ST Stand Rickshaw Problem: स्वारगेट एसटी स्थानकात रिक्षांची घुसखोरी; अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा धोका

अनधिकृत अतिक्रमण कारवाई रात्रीच्या वेळेत करण्यात येते. कष्टकऱ्यांवर हा अन्याय आहे. आम्ही याच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे.

बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, नॅशनल फेरीवाला संघ

Pune Licensed Street Vendors Eviction
Pune Toxic Liquor Case: पुण्यातील विषारी गावठी दारूकांडातील ९ आरोपींवर मोक्का; २१ बळी घेणाऱ्या दारूमाफियांवर सीआयडीची कारवाई

सर्व व्यावसायिक परवानाधारक आहेत. मागील १५ वर्षांपासून इथे व्यवसाय करतात. एका रात्रीत नोटीस न देताच कारवाई झाली, याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जनआंदोलन उभारणार आहोत.

अश्विनी लांडगे, नगरसेविका

वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी रात्रीच्या वेळी अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे.

सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news