दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड; शस्त्रे जप्त

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड; शस्त्रे जप्त
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या सराईतांच्या टोळीला मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयता, तलवार अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यातील एकावर तब्बल 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हर्षवर्धन ऊर्फ लकी मोहन, कुलदीप ऊर्फ कुणाल संजय साळुंखे (वय 19), तेजस ऊर्फ सनी अश्विन पिल्ले (वय 20, तिघे रा. केशवनगर, मुंढवा), शशांक श्रीकांत नागवेकर (वय 20, रा. सुशील सिद्धी सोसायटी, केशवननगर, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

साळुंखेवर चार दखलपात्र, दोन अदखलपात्र, रेड्डी याच्यावर दखलपात्र 13 गुन्हे, पिल्ले यांच्यावर 1 दखलपात्र आणि दोन अदखलपात्र, तर नागवेकर यांच्यावर दोन दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस हवालदार दिनेश भांदुर्गे यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंढव्यातील झेड कॉर्नर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड लुटण्याच्या तयारीत चोरट्यांची टोळी असल्याची माहिती मुंढवा पोलिसांना बुधवारी मध्यरात्री मिळाली.

पोलिसांच्या पथकाने सापळा लावून रेड्डी, साळुंखे, पिल्ले, नागवेकर यांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. चौघांकडून कोयता, तलवार, गज अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. पोलिस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विलास सुतार, संदीप जोरे, उपनिरीक्षक धनंजय गाडे, सहायक पोलिस फौजदार संतोष जगताप, अंमलदार दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, संतोष काळे, राहुल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news