Pune Police: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना जिल्ह्याबाहेरचा रस्ता

शंभर सराईत पोलिसांंच्या रडारवर
Pune Police
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना जिल्ह्याबाहेरचा रस्ताFile Photo
Published on
Updated on

पुणे: शहरातील 29 गुंडांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी बाणेर, चतुःशृंगी, येरवडा, चंदननगर, खराडी, वाघोली, लोणीकंद परिसरातील 26 सराइतांना तडीपार करण्याचे आदेश दिले. तर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कात्रज भागातील तीन गुंडांना तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. (Latest Pune News)

Pune Police
Show Cause Notice: राज्यातील 175 फार्मसी महाविद्यालयांना ’कारणे दाखवा’

परिमंडळ चारमधील तडीपार केलेल्या गुंडांची नावे

शिवाजी लक्ष्मण रामावत (वय 30, रा. लमाणतांडा, पाषाण), सचिन अशोक रणपिसे (वय 20, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), सुरज ऊर्फ किल्या विलास बाणेकर (वय 35, रा. येरवडा), मोहम्मद ऊर्फ रहिम रहेमान शेख (वय 19, रा. येरवडा), सलमान चाँदबाशा शेख (वय 30, रा. वाघोली), महेश बलभीम सरोदे (वय 22, रा. येरवडा), सुंदर ऊर्फ कुबड्या राजाराम मेत्रोळ (वय 35, रा. पर्णकुटी, येरवडा), नंदकुमार संजय पासंगे (वय 22, रा. कामराजनगर, येरवडा), आशा सीताराम राठोड (वय 48, रा. येरवडा), शांताबाई गोविंद राठोड (वय 50, रा. नाईकनगर, येरवडा), नीता सुनील नगरकर (वय 63, रा. वडगाव शेरी), गणेश प्रकाश जाधव (वय 19, रा. बाणेर), प्रेम विकी ससाणे (वय 19, रा. येरवडा), मानकीबाई कमलेश चव्हाण (वय 50, रा. येरवडा), सोनीबाई बासू राठोड (वय 60, येरवडा), मुन्नीबाई रेड्डी राठोड (वय 50, रा. नाईकनगर, येरवडा), अंबू राजू धोत्रे (वय 49, रा. गोखलेनगर), गणेश उत्तम वाघमारे (वय 22, रा. चंदननगर), नीलेश राहुल वाघमारे (वय 25, रा. थिटेवस्ती, खराडी), सत्यम राजू चमरे (वय 24, रा. पेरणे, हवेली), मोहम्मद हुसेन खान (वय 22, रा. गाडीतळ, येरवडा), गोपाळ संजय यादव (वय 26, रा. बकोरी रोड, वाघोली), शशी पांडू चव्हाण (वय 42, रा. नाईकनगर, येरवडा), मोहन बागीवानजाधव (वय 41, रा. जनवाडी, गोखलेनगर),हबीब इबालू इराणी (वय 23, रा. इराणीवस्ती, शिवाजीनगर), कमल सुभाष चव्हाण (वय 36,रा. नाईकनगर, येरवडा)

Pune Police
MahaRERA: बिल्डरांच्या फसवेगिरीवर येणार टाच; नोंदणी विभागाच्या वेबसाईटला ‘महारेरा पोर्टल’ जोडणार

शंभर सराईत पोलिसांंच्या रडारवर

परिमंडळ चारच्या हद्दीतील 100 हून अधिक सराइतांच्या हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. त्यांच्याविरुद्धही लवकरच प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. तडीपार केलेले आरोपी पुन्हा शहरात आल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कात्रजमधील तीन गुंड तडीपार

कात्रज भागातील तीन सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले. अभय ऊर्फ सोन्या अशोक निसर्गंध (वय 20, रा. सिद्धिविनायक कॉलनी, आंबेगाव खुर्द), विनोद दिलीप धरतीमगर (वय 22, रा. आंबेगाव बुद्रुक), प्रथमेश ऊर्फ अभय देविदास कुडले (वय 21, रा. दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक) अशी तडीपार केलेल्या गुंडांची नावे आहेत. तिघांना पुणे शहर, जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तिघांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी तयार केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news