

पुणे: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे 1947 मध्ये शहराला गणेश विसर्जन मिरवणुकीचा इतिहास आहे. त्या वर्षी शहरातील मिरवणुका 6 तास 30 मिनिटांत आटोपली होती. नंतर वर्षागणिक त्या कालावधीत वाढ होत तब्बल 33 तासांवर पोहचली.
गेल्या काही वर्षांपासून गर्दीमुळे हा कालावधी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सरासरी 27 ते 31 तासांचा कालाधीव कमी होत नाही. यंदाही हा कालावधी कमी करण्याचे अनेक पातळीवर प्रयत्न झाल्याने यंदा मिरवणूक किती तासांत संपणार, याची उत्सुकता सामान्य नागरिकांना लागली आहे. (Latest Pune News)
सार्वजनिक गणेशोत्सव पुणे शहरातून महाराष्ट्रात गेला अन् आता तो संपूर्ण देशासह अनेक देशांत पोहचला. त्यामुळे पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीतील जबरदस्त जल्लोष, उत्साह पाहण्यास देश-विदेशातून पर्यटक येतात.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून होणार्या अलोट गर्दीमुळे पोलिस यंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या मिरवणुकीचा कालावधी कमी करण्याचे प्रयत्न दरवर्षी पोलिस आयुक्त करतात. गणेश मंडळांना आवाहनही केले जाते. त्यामुळे यंदाची मिरवणूक किती तासांत संपणार, याची उत्सुकता आणि चर्चा सामान्य नागरिकांत आहे.
असा वाढत गेला कालावधी (1948 ते 2024)
1948 - 6 तास 30 मि.
1949 - 8 तास
1952 - 9 तास 15 मि.
1953 - 9 तास 30 मि.
1954 - 11 तास
1967 - 17 तास 24 मि.
1978 - 21 तास 30 मि.
1989 - 29 तास 25 मि.
2005 - 33 तास 20 मि. (विक्रमी वेळ)
2016 ते 19 - 28 तास 15 मि.
2020 ते 2021 - कोरोनामुळे मिरवणूक नाही
2022 - 31 तास
2024 - 30 तास 15 मि.