Ganesh Chaturthi: नव्या तालांवर डोलणार यंदाच्या गणेश मिरवणुका

रुद्र, वारकरी, महाकालसह रेल्वे, पिंपसारख्या वेगळ्या नावांचे तालही ढोल-ताशांवर घुमणार
Ganesh Chaturthi
विस्मृतीत गेलेल्या पाककृती आणि गणेशोत्सवFile Photo
Published on
Updated on

सुवर्णा चव्हाण

पुणे: गणेशोत्सवातील ढोल-ताशावादनांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही नव्या तालांचा आवाज घुमणार आहे. रुद्र, वारकरी, महाकाल अन् आराध्य यांसारख्या तालांबरोबर रेल्वे, इंजिन, पिंप, गावठी यांसारखी अजब नावे असलेले तालही मिरवणुकांमधील ढोल-ताशावादनातून ऐकायला मिळणार आहेत. या तालांचा विविध वाद्य पथकांकडून कसून सराव सुरू असून, नव्या तालांमुळे यंदाच्या मिरवणुकांमध्ये बहार येणार आहे.

गणेशोत्सवातील दहाही दिवसांत ढोल-ताशा पथकांच्या तालाचा निनाद तरुणाईला वेड लावतो. मिरवणुकांमध्ये आणि उत्सवाच्या इतर दिवसांमध्येही पथकांद्वारे नेहमीचे पारंपरिक ताल वाजविले जातातच. पण, पथकांकडून दरवर्षी नवीन तालही बसविले जातात आणि त्याचा निनाद उत्सवात ऐकायला मिळतो. Ganesh Chaturthi

Ganesh Chaturthi
Ajit Pawar: ‘दादा, पहाटेचा एक दौरा धायरीच्या डीपी रस्त्याला पण होऊ द्या की!

पुण्यात 170 हून अधिक ढोल-ताशा पथके आहेत. त्यातील बहुतांश पथकांनी नवीन ताल बसविले आहेत आणि उत्सवात गावठी ठेका, लावणी, गरबा असे ताल ऐकायला मिळणार आहेत. त्यानुसार पेहरावही केला जाणार असून, उत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी हे नवीन ताल वाजविले जाणार आहेत.

याविषयी अभेद्य वाद्य पथकातील स्नेहल सुरसे म्हणाली, दरवर्षी गणेशोत्सवात नेहमीच्या तालांच्या जोडीला नवीन ताल उत्सवासाठी तयार करण्यात येतात. संबळ, कच्ची, ढोलीबाजा, ताल, महाकाल, मावळ, केरळी, तीन ठोका, पाऊण असे विविध ताल वाजवतो. यंदाही आम्ही काही ताल बसविले आहेत, त्याचा गजर उत्सवकाळात ऐकायला मिळेल. उत्सवासाठी वादकांनी तयारी केली असून, प्रत्येकाने नवीन ताल वाजविण्याचा जोरदार सराव केला आहे. वादनाचा जल्लोष नक्कीच पुणेकरांना अनुभवता येईल. (Latest Pune News)

Ganesh Chaturthi
Missing boys: अभ्यासात मन लागत नाही म्हणून तिघांनी सोडले घर; आरपीएफच्या पुणे पथकाने लावला मुलांचा शोध

ताल अन् महाकाल मिरवणुकांमध्ये भरणार उत्साह

नाद वरदहस्त वाद्य पथकाचे सिद्धांत साळुंके म्हणाले, उत्सवात ढोल-ताशा पथकांच्या तालावर तरुणाई थिरकते. यंदाही तालाच्या निनादात तरुणाईला थिरकवण्यासाठी आमच्या पथकातील वादकांनी तयारी केली आहे. आम्ही ताल आणि महाकाल हे ताल वाजविणार आहोत. प्रत्येक वादकामध्ये वादनाचा उत्साह संचारला असून, तोच उत्साह उत्सवामध्ये पाहायला मिळेल.

आमचे पथक गेल्या 42 वर्षांपासून आपल्या वादनसेवेने श्री गणरायाची अविरत सेवा करीत आले आहे. आम्ही ढोल-ताशावरच ताल वाजवतो आणि इतर तालवाद्यांचा वापर वादनासाठी करीत नाही. पथकातील सर्व ताल हे एका मालिकेत गुंफलेले असतात. प्रत्येकाला नावीन्याची आवड असते, तशीच आम्हालाही आहे. दरवर्षी नवीन ताल बसवतो. यावर्षी आम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी वारी करणार्‍या वारकर्‍यांवर आधारित वारकरी हा ताल बसविला आहे, तर आम्ही भजन ठेक्यातील एकपट आणि दुप्पट यांचा उपयोग करून नवीन रचना तयार केली आहे. त्याशिवाय 2011 साली आम्ही 21 ठेक्यांचा नैवेद्य लाडक्या गणरायाला अर्पण केला होता, यावर्षी त्याच संगीतामधील ताल जोगन याची काही विशिष्ट आवर्तने रचनेत समाविष्ट केली आहेत.

- शांतिसागर निपुणगे, अध्यक्ष, रमणबाग युवा मंच (ट्रस्ट)

रुद्र गर्जना पथकाची सुरुवात 2013 साली झाली. पथकात सध्या विविध क्षेत्रांतील 450 तरुण-तरुणी वादन करीत आहेत. दरवर्षी पथक गणेश उत्सवात नवीन ताल बसवायचा प्रयत्न करीत असतो. यावर्षीसुद्धा पथकाने रुद्र, आराध्य आणि पिंप असे तीन नवीन ताल बसविलेले आहेत. नवीन ताल आम्ही मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि हुतात्मा बाबू गेनू मंडळाच्या मिरवणुकीत वाजवणार आहोत.

- अ‍ॅड. राहुल नायर, अध्यक्ष, रुद्रगर्जना वाद्य पथक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news